लेट पण थेट झटका! इंदोरीकर महाराजांना कोर्टाने दिलासा दिल्याने महाराजांनी पाठवल्या ‘या’ सर्वांना नोटीस

0 8

पुणे : सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या पुत्रप्राप्तीच्या वादग्रस्त विधानावरुन त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला होता. मात्र संगमनेर न्यायालयाने खटला रद्द करत या खटल्यातून त्यांना न्यायालयाने नुकताच दिलासा दिला आहे.

पण या सर्व प्रकरणामुळे त्रासलेल्या इंदोरीकर महाराजांनी त्यांचे वक्तव्य प्रसारित करणाऱ्या यूट्यूब चॅनल विरोधात तक्रार दाखल केल्यामुळे, ते वक्तव्य प्रसारित करणाऱ्या युट्युब चॅनल्सच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

इंदोरीकर महाराजांनी, “युट्युब चॅनल्सनी माझ्या नावावर बक्कळ पैसा कमावला. मी इतके कष्ट करुन कीर्तन करतो. त्यात एखादे वाक्य चुकीचे गेले. मुळात ते चुकीचे नाही. भागवतात आणि ज्ञानेश्वरीतही असे म्हणले आहे. तरी देखील टीका होत आहे.” या सर्व प्रकरणामुळे त्रासल्याने आणि सहनशीलता संपल्याने युट्युब चॅनलविरुद्ध तक्रार दाखल केल्याचे त्यांनी म्हणले आहे.

दरम्यान, १६ जुलै २०२० ला किर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी पुण्याच्या स्वारगेट पोलिस ठाण्यात इंडियन आयटी ॲक्ट ६६, ६६ सी, ४३ आय आणि भारतीय दंड विधान कलम ५०४ व ५०६ नुसार तक्रार दाखल केली होती.

मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे तक्रारीचा तपास संथगतीने सुरू होता. परंतु, फेब्रुवारी २०२१ नंतर या तपासाला वेग आला आणि याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी २५ ते ३० मोठ्या यूट्यूब चॅनल्सला नोटीस पाठवल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.