जाणून घ्या गुढीपाडव्याचा पूजेचा मुहूर्त, तिथी व पूजा विधी

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आज आपण गुडीपाडवा साजरा करणार आहोत.

0 0

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आज आपण गुडीपाडवा साजरा करणार आहोत. हा दिवस शालिवाहन संविस्तराचा पहिला दिवस, साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.

मुहूर्त – 

तिथी प्रारंभ – 12 एप्रिल सकाळी 8 वाजून एक मिनिटानंतर
तिथी समाप्ती – 13 एप्रिल सकाळी 10 वाजून 17 मिनिटापर्यंत

पूजाविधी – 

गुढीपाडव्याच्या दिवशी सरस्वती देवीची देखील पूजा केली जाते. या दिवशी गुढी उभारण्याचे विशेष महत्व असते. बांबूच्या उंच काठी वर हि गुढी उभारली जाते. हि गुढी घराच्या छतापासून वर बांधण्याची प्रथा आहे पण सहसा हे शहरी भागात शक्य नसल्याने गुढी उभारण्यालाच अधिक महत्व दिले जाते.

गुढी उभारण्यासाठी वापणार असणारा बांबू स्वछ धुवून घ्या, त्या नंतर या बांबूला एक स्वछ वस्त्र किंवा साडी गुंढाळा, यावर कडीलिंब, आंब्याची डहाळी, फुलांची आणि साखरेची माळ बांधा, या सर्व गोष्टींवर तांब्याचा कलश उपडा ठेवून तो सुद्धा घट्ट करा. सजवलेल्या या बांबूच्या काठीला अष्टगंध, हळद-कुंकू वहा, यानंतर तुम्ही गुढी उभारणार असाल ती जागा स्वछ धुवून घ्या, आता गुढी उभारून त्याची पूजा करून घ्या, नैवेद्य दाखवा, संध्याकाळच्या वेळी हि गुढी उतरवून घ्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.