Akola : अकोल्यात बिबट्याचे हल्ले वाढले

अकोले : तालुक्यातील विविध भागांत बिबट्याचे हल्ले वाढल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.

0

अकोले : तालुक्यातील विविध भागांत बिबट्याचे हल्ले वाढल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. बोरी, भोळेवाडी, पिसेवाडी गावांत बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. शेतकऱ्यांचे पशुधन बिबट्या फस्त करीत असून, नुकसान भरपाई मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही.

गेल्या महिन्यात कोंबड्या, गायी, शेळ्या बिबट्याने फस्त केल्या. त्यामुळे परिसरातील मुले शाळेत जायला धजावत नाहीत. शेतकरीही शेतात सहजासहजी जात नाहीत. बिबट्या दिवसा हल्ला करत आहे. गेल्या महिनाभरात जवळपास २०० कोंबड्या त्याने फस्त केल्या आहेत. गायी, शेळ्यांवरही ताव मारला आहे. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागते. ती करूनही भरपाई मिळत नाही.

याबाबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार करूनही फायदा होत नाही. बिबट्यांच्या संख्येबाबत वन विभागाकडे कोणतीही माहिती नाही. याबाबत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार करूनही फायदा होत नाही. बिबट्यांच्या संख्येबाबत वन विभागाकडे कोणतीही माहिती नाही.

-बिबट्यांच्या संख्येबाबत अनिश्चितता आहे. एका तालुक्यातील पकडलेले बिबटे शेजारच्या तालुक्यात सोडले जातात. नगर जिल्ह्यात अकोले आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर, भीमाशंकर ही बिबटे सोडण्याची ठिकाणे झाली आहेत. त्यामुळे येथे बिबट्यांची संख्या मोठी आहे. मानवी हल्ले, पशुधन नुकसान फक्त शेतकऱ्याचेच होते. यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

– प्रा. मच्छिंद्र देशमुख, वन्यजीव अभ्यासक

नुकसानीचे आकडे

राजाराम भुतांबरे या शेतकऱ्याच्या २०० कोंबड्या फस्त

किशोर देशमुख यांची एक गाय

अशोक देशमुख, शरद रोकडे, संदीप रोकडे, शंकर बर्वे, सोमनाथ गोडे यांची प्रत्येकी एक

शेळी, बोकड वाचविण्यात यश

बिबट्यांची संख्या माहिती नाही

अकोले वन विभागाचे वनाधिकारी प्रदीप कदम यांच्याशी याबाबत संपर्क साधला. खासगी व वनक्षेत्र असे दोन भाग असल्याने तालुक्यात नेमके बिबटे किती, असा प्रश्‍न त्यांनी केला. त्यामुळे वन विभागाकडे बिबट्याची अद्ययावत संख्याच नसल्याचे समोर आले.

Leave A Reply

Your email address will not be published.