प्रत्येक वर्षी तुमच्या खात्यात येतील १ लाख, एलआयसीची खास योजना

या स्कीममध्ये एका निश्चित कालावधीनंतर निश्चित रक्कम मिळण्यास सुरूवात होते. या स्कीममध्ये ३० ते ८५ वर्षांच्या वयोगटातील नागरिक गुंतवणूक करू शकतात. या पॉलिसीवर कर्जदेखील घेता येते.

0 47

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या या अभूतपूर्व संकटात आपल्या भवितव्याबद्दल प्रत्येकालाच चिंता वाटते आहे. लोक आपली सर्व बचत आणि पैसा खर्चूनदेखील आपल्या आप्त-स्वकीयांचा जीव वाचवू शकत नाहीत. अशा वेळी ज्यांच्याकडे निश्चित उत्पन्नाचे साधन नाही अशा लोकांची चिंता आणखीच वाढली आहे. जर तुम्हालाही असे वाटते की आपल्याकडे एक निश्चित उत्पन्नाचे साधन असावे तर तुमच्यासाठी एलआयसीची (LIC) एक पॉलिसी चांगला पर्याय ठरू शकते. या पॉलिसीमध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी एक लाख रुपयांची निश्चित रक्कम मिळत राहील.

एलआयसीची (LIC) न्यू जीवन शांति स्कीम

एलआयसीची (LIC) न्यू जीवन शांति स्कीम ही एक पेन्शन स्कीम आहे. भविष्याच्या आर्थिक तरतूदीसाठी तुम्ही यात गुंतवणूक करू शकता. या पॉलिसीचे वैशिष्ट्ये हे आहे की यामध्ये पॉलिसीधारकांना एक निश्चित रक्कम दरवर्षी किंवा दर महिन्याला मिळते. या पॉलिसीमध्ये तुम्हाला लगेच किंवा ५, १०, १५ किंवा २० वर्षांनी पेन्शन सुरू करण्याचा पर्याय मिळतो.

दरवर्षी मिळतील असे १.०५ लाख रुपये

समजा तुम्ही ३५ व्या वर्षी एलआयसीची जीवन शांति स्कीम ही पॉलिसी घेतली आणि २० वर्षांनंतर आपले पेन्शन निश्चित केले. तर या पॉलिसीअंतर्गत तुम्हाला २१.६ टक्के व्याज वार्षिक आधारावर पेन्शन रुपात मिळतील. जर तुम्ही या पॉलिसीमध्ये एकरकमी ५ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर तुम्हाला २० वर्षानंतर पेन्शनच्या रुपात प्रत्येक वर्षी १.०५ लाख रुपये मिळतील. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पेन्शनची रक्कम ५,१० किंवा १५ वर्षांनीदेखील सुरू करू शकता. मात्र यामध्ये तुम्हाला कमी परतावा मिळेल.

पॉलिसीत मिळतात यादेखील सुविधा

या पॉलिसीमध्ये एका निश्चित कालावधीनंतर एक निश्चित रक्कम मिळण्यास सुरूवात होते. या स्कीममध्ये तुम्हाला कर्जदेखील घेता येते. जर या पॉलिसीत तुम्हाला काही अडचण येत असल्यास तुम्ही ३ महिन्यानंतर ही पॉलिसी सरेंडरदेखील करू शकता. पॉलिसी सुरू झाल्यानंतर एक ते २० वर्षांच्या मध्ये तुम्ही केव्हाही पेन्शन सुरू करू शकता. मात्र हा पर्याय तुम्हाला पॉलिसी घेतानाच निवडायचा असतो नंतर तुम्हाला यात बदल करता येत नाही.

भविष्यातील आर्थिक गरजांसाठी आणि रिटायरमेंटचे आयुष्य तणावमुक्त जगण्यासाठी आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे असते. यासाठी तरुण वयातच बचत करून गुंतवणूक करायला सुरूवात केली पाहिजे. यामुळे दीर्घ कालावधीत तुम्ही एक मोठी रक्कम उभी करू शकाल. रिटायरमेंटनंतर तुमचे नियमित उत्पन्न बंद झालेले असते. वय झाल्यामुळे तुम्ही आणखी मेहनत करू शकत नाही. अशा वेळी तरुणपणी केलेली बचत आणि गुंतवणूक तुमचा दैनंदिन खर्च, आपत्तकालीन खर्च आणि इतर गरजांसाठी उपयोगी ठरू शकतो. आर्थिक नियोजनात आयुर्विमा आणि आरोग्यविम्याचे महत्त्व मोठे आहे. तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजांच्या तरतूदीसाठी आर्थिक तजवीज यातून होते. आर्थिक नियोजन करून तुम्ही आर्थिक स्थैर्य मिळवू शकता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.