अकोला : सुनेला रॉकेल टाकून जाळणाऱ्या आतेसासुला जन्मठेप

घराबाजुला राहणाऱ्या सुनेसोबत वाद करुन तिला घाटसलेट टाकून पेटविणाऱ्या आरोपी आतेसासुला जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

0 7

अकोला : घराबाजुला राहणाऱ्या सुनेसोबत वाद करुन तिला घाटसलेट टाकून पेटविणाऱ्या आरोपी आतेसासुला जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यासोबत पाच हजार रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्षाचा कठोर कारावास सुद्धा आरोपी आतेसासूला भोगावा लागेल. घटनेतील फरार दुसरी आरोपी अनिता राजू धवसे हिच्या विरुद्धा पकड वॉरंट जारी केला आहे. (Life imprisonment for mother-in-law who burns doughter in law)

घटनेची हकीकत अशी की, मृतक सोनू संजय इंगळे (रा. फेटा, ता. बार्शीटाकळी) तिच्या पती सोबत राहत होती. तिच्या घराच्या बाजुला तिची आतेसासु आरोपी बेबी भारत श्रृंगारे व तिची मुलगी अनिता राजू धवसे राहत होत्या. २७ डिसेंबर २०१२ रोजी सकाळी ९ वाजता आरोपी बेबी भारत श्रृंगारे व तिची मुलगी अनिता राजू धवसे यांचे मृतक सोनू संजय इंगळे हिच्या सोबत भांडण झाले होते. त्या कारणावरुन आरोपी बेबी भारत श्रृंगारे व तिची मुलगी अनिता राजू धवसे यांनी मृतक हिच्या अंगावर घासलेट टाकून तिला जाळले. त्याच दिवशी मृतक सोनू संजय इंगळे हिला सवौपचार रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.