लिव्ह इन – लग्न न करता एकत्र राहणाऱ्यांना उच्च न्यायालयाचा धक्का

0 76

चंदिगढ : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकारार्ह असल्याचे सांगत एका जोडप्याने संरक्षण मिळावे म्हणून केलेला अर्ज पंजाब आणि चंदिगढ़ उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.

उत्तर प्रदेशमधील एक १९ वर्षीय महिला आणि पंजाबमधील एक २२ वर्षीय जोडप्याने या महिलेच्या कुटुंबीयांपासून पंजाब पोलिसांनी संरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्या. एच. एस. मदान यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, याचिकाकर्त्यांनी ही याचिका त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब व्हावे या उद्देशाने केली आहे. ते नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकारार्ह आहे. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्याचे आदेश देऊ शकत नाही. तसेच ही याचिका काढून टाकत आहोत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.