आज रात्रीनंतर पुण्यात असेल ‘इतक्या’ दिवसांचा लॉकडाऊन! लॉकडाऊन मध्ये मिळणार फक्त ‘या’ सेवा

0 0

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
पुणे : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता मागच्या शनिवार-रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतरही रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने राज्यात १४ एप्रिल मध्यरात्रीपासून पुढील १५ दिवस कडक निर्बंध घालून संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र अशातच आता पुणे जिल्ह्यासाठी राज्यापेक्षा स्वतंत्र नियमावली बनविली आहे.

या नव्या नियमावली अंतर्गत पुण्यात शनिवार आणि रविवार असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लागू असेल. तर आवश्यक वस्तूंची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत उघडी असतील.

तसेच, सोमवार ते शुक्रवार या काळात संचारबंदी लागू असून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना दिवसा समज दिली जात असून रात्री कोणाचीही गय केली जाणार नाही. असा सक्त आदेश पुणे, पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी बुधवारी दिला आहे.

दरम्यान, या दोन दिवसाच्या विकेंड लॉकडाऊन मध्ये केवळ दूध मिळणार असून मेडिकलची दुकाने वगळता इतर दुकाने बंद असतील. तसेच हा विकेंड लॉकडाऊन मागील आठवड्याप्रमाणेच कडक असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.