जाणून घ्या : २१ जून वर्षातील सर्वात मोठा दिवस – आज १३ तासांचा दिवस आणि ११ तासांची रात्र… पण असं का?

२१ जून रोजी दिवसातील एकूण २४ तासांपैकी १३ तास १३ मिनिट कालावधी हा दिवसाचा असतो तर १० तास ४७ मिनिटांची रात्र असते. हा वर्षातील सर्वात मोठा दिवस

0 33

आज २१ जून. हा दिवस जगभरामध्ये जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र आजच्या दिवसाचे आणखीन एक महत्व म्हणजे आजचा दिवस हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. आता असे असण्यामागे नेमके कारण काय असेल असा प्रश्न तुम्हाला पडणे सहाजिक आहे. तर यामागील कारण आहे पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. आज सामान्यपणे दिवसातील  २४ तासांपैकी १३ तासांहून अधिक काळ दिवस असतो. म्हणूनच आजचा दिवस हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. आज १३ तास १३ मिनिट कालावधी हा दिवसाचा असतो तर १० तास ४७ मिनिटांची रात्र असते. आजपासून उत्तरायण संपून दक्षिणायण सुरु होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते.

२१ जून हा सर्वात मोठा दिवस असला तरी प्रत्येक देशात किती तास सूर्यप्रकाश असणार याची गणितं वेगळी असतात. काही ठिकाणी १३ तासांहूनही अधिक काळ सूर्यप्रकाश असतो. या दिवसाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, याच दिवसापासून दक्षिण गोलार्धातील बऱ्याच देशांमध्ये हिवाळ्याची सुरुवात होते. तर काही देशांत उन्हाळा सुरु होतो. त्याच निमित्त आज गुगलने खास डूडल बनवलं आहे.

२१ जून २०१९ रोजीचे गुगल डूडल

काही देशांत २१ जून हा दिवस एखाद्या सणासारखा देखील साजरा केला जातो. पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी प्रति तास वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील २१ जून जसा मोठा दिवस असतो तसाच वर्षातला लहान दिवस २२ डिसेंबर असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होत असते.

Leave A Reply

Your email address will not be published.