“असं वापरा मास्क”, माधुरी दीक्षित देतेय मास्क वापरण्याचे धडे

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

0 30

गेल्या काही दिवसांपासून करोनाने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सामान्य नागरिकांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यातच अनेक सेलिब्रिटी चाहत्यांना घरीच राहून योग्य काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. अनेक सेलिब्रिटी वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत या काळात व्यायाम करून किंवा योग्य आहार घेत कशी काळजी घेता येईल हे सांगत आहेत.

नुकताच धकधक गर्ल माधुरी दीक्षितने एक व्हिडीओ शेअर करत मास्कचा वापर योग्य प्रकारे कसा करावा याबद्दल सांगित सुरक्षित रहा असा सल्ला दिला आहे. माधुरीने शेअर केलेल्या या व्हिडीओत अनेक जण कश्या प्रकारे चुकीच्या पद्धतीने मास्क वापरतात हे तिने दाखवलं आहे. काही जण नाकाच्या खाली तर काही जण अगदी हनुवटीवर मास्क घालतात हे दाखवत तिने या पद्धती चुकीच्या असल्याचं सांगितलं आहे.

 

माधुरीने पूर्ण पणे नाक आणि तोंड झाकेल असं मास्क लावत ते योग्य प्रकारे कसं घालावं हे चाहत्यांना दाखवून दिलं आहे. मास्क घातल्यानंतर ते फिट बसणं गरजेचं असल्याचं तिने या व्हिडीओत दाखवून दिलं आहे.

माधुरी दीक्षित ‘डान्स दीवाने’ या शोमध्ये जजची भूमिका निभावतेय. या शोचा सुत्रसंचालक राघव जुयालला नुकतीच करोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी धर्मेशला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्याआधी ‘डान्स दीवाने’च्या सेटवर १८ लोकांना करोनाची लागण झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.