अर्थसंकल्पी अधिवेशन Live: ओबीसी आरक्षण प्रश्नी थोड्याच वेळात विधानभवनामध्ये बैठक

आज दिवसभरात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात मोठ्या घडामोडी घडतील,

0

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनचा दुसरा आठवडा आजपासून सुरु होत आहे. आज सभागृहात ओबीसी विधेयक आणण्यासंदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. या विधेयकाचा मसुदा मध्य प्रदेशच्या धरतीवर असणार आहे. आज दिवसभरात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात मोठ्या घडामोडी घडतील, अशी शक्यता आहे. एका बाजूला सत्ताधारी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करतील तर विरोधकांचा पवित्रा आक्रमक असल्याचं दिसून येण्याची शक्यता आहे.

  • ओबीसी आरक्षण प्रश्नी थोड्याच वेळात विधानभवनमध्ये बैठक
  • बैठकीला महविकास आघाडीचे राहणार उपस्थित
  • बैठकीत विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ओबीसी राजकिय आरक्षण संदर्भात विधेयक मांडण्यात येणार यावर चर्चा
  • विधेयकामध्ये निवडणुक आयोगाककडून वॉर्ड रचना आणि सिमांकनाचे अधीकार राज्य सरकारला देण्यासंदर्भात चर्चा
  • महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्या शुक्रवारी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुनच मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाला होताा. हे सरकार या आरक्षणासंदर्भात गाफील असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता, तर आम्ही पुरेपुर प्रयत्न करत असून कायदेशीर बाबींमुळे या अडचणी येत असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. आपण दोन्ही बाजूंनी ओबीसींसाठी पुन्हा प्रयत्न करु.
  • आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत, हे देखील सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. यासंदर्भातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन देत म्हटलं होतं की, ओबीसी अरक्षणाबाबत आम्ही विधेयक तयार करत आहोत, ते सोमवारी पटलावर मांडू. या प्रश्नावर मार्ग निघावं हीच इच्छा आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.