Maharashtra Lockdown Update: महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची शक्यता? येत्या मंत्रिमंडळात होणार चर्चा

महाराष्ट्रात मुंबई मध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असली तरीही 11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.

0 103

महाराष्ट्रात कोविड 19 (COVID 19) च्या दुसर्‍या लाटेमध्ये वाढती रूग्णसंख्या आणि संसर्ग रोखण्यासाठी सरकारने ब्रेक द चेन (Break The Chain) अंतर्गत नियम कडक केले आहेत. दरम्यान या लॉकडाऊनचा (Lockdown) सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याने अजून थोडा काळ हा लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो का? यावर आता चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान येत्या बुधवारी होणार्‍या राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुंबई सहीत राज्यातील इतर शहरांमधील कोविड 19 परिस्थितीचा विचार केला जाणार आहे.

महाराष्ट्रात मुंबई मध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असली तरीही 11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. कडक लॉकडाऊन असलेल्या जिल्ह्यांमध्ये नाशिक, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यभर लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान काल राज्यात 24 तासात 37,236 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. 549 जणांचा मृत्यू झाला तर 61,607 जणांनी कोरोनावर मात केल्याचं चित्र आहे. लॉकडाऊनच्या वेळेत सरकार कडून इतर सोयी सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. देशातील तज्ञांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर- ऑक्टोबर महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे त्याअनुशंगाने देखील कामं हाती घेण्यात आली आहेत.

राज्यात लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत देण्यात आलेल्या माहितीनुसार, 1 कोटी 80 लाख 88 हजार 042 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 9 मे 2021 रोजी 3718 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून 110448 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे तिसर्‍या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी अधिकाधिक लोकांना लस देण्याकडे सरकारचा प्रयत्न आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.