महाराष्ट्रतील कराटेपटू रोहित भोरे यांची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

0 20
कराटेपटू रोहित भोरे यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ने मोस्ट एक्स्टेंशन पंचेस इन थ्री मिनिट असे आव्हान दिले होते. रोहित भोरे यांना हा रेकॉर्ड पूर्ण करण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ने ३ मिनिटात एकूण ९१९ पंचेस मारण्याचे आव्हान दिले होते परंतू रोहित भोरे यांनी ९५० पंचेस मारून विश्व् विक्रम प्रथापित केला. हा रेकॉर्ड करणारे रोहित भोरे हे जगातील व कराटे क्रीडा क्षेत्रातील प्रथम व्यक्ती आहेत. रोहित भोरे यानी या अगोदर लिंमका बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन, इंटरनॅशनल बुक रेकॉर्ड आणि राष्ट्रीय रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये याची नोंद झालेली आहे.
हा रेकॉर्ड करण्यासाठी रोहित भोरे यांना १ वर्षा चा सराव लागला. या त्यांना दुखापत ही झाली. परंतु जिद्द आणि चिकाटी व स्वतःवर आत्मविश्वास ठेवून त्यांनी हा ही अशक्य असा रेकॉर्ड शक्य करून दाखवला.सदर कार्यक्रमात श्री.राजेंद्र तेले (स्पोर्ट्स एक्स्पर्ट), श्रीमती.स्नेहल साळुंखे (जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे), श्रीमती.प्रज्ञा धेंडे (माजी नगराध्यक्षक व नगरसेवक सेविका अंबरनाथ नगरपरिषद), श्री. धर्मराज रायबोले (पशुसंवर्धन अधिकारी महाराष्ट्र राज्य), श्री. धीरज चव्हाण (अतिरिक्त मुख्याधिकारी अंबरनाथ नगरपरिषद), श्री. संजय बेंडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ पश्चिम), श्री. मधुकर भोगे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबरनाथ पूर्व), माननीय अंबरनाथ पत्रकार संघ आणि श्री. यश काळे व निशांत बनसोडे (टाइम किपर) म्हणून मान्यवर उपस्थित होते.
कराटे क्रीडा क्षेत्रात ता.अंबरनाथ जि.ठाणे येथील कु. रोहित भोरे यांनी “मोस्ट एक्स्टेंशन पंचेस इन थ्री मिनिट” या मध्ये ९५० पंचेस मारून “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये नाव नोंदविले ही बाब अभिनंदास्पद व कौतुकास्पद आहे या कामगिरी ची दखल माननीय.ना.श्री. अजित दादा पवार साहेब (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांनी त्यांच्या मंत्रालय येथील कार्यलयात बोलावून विशेष सत्कार करण्यात आला. आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या .

Leave A Reply

Your email address will not be published.