Maharashtra Unlock : महाराष्ट्र आजपासून अनलॉक, तुमच्या जिल्ह्यात/शहरात कोणते निर्बंध शिथिल?

जवळपास दोन महिन्यांनंतर आजपासून (7 जून) महाराष्ट्र अनलॉक होत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेसह सुरु होणार असून आता खुल्या मैदानात बागडता येणार आहे. तुमच्या जिल्ह्यात कोणते निर्बंध शिथिल झाले आहेत, जाणून घेऊया

0 30

मुंबई : जवळपास दोन महिन्यांनंतर आजपासून (7 जून) महाराष्ट्र अनलॉक होत आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यानुसार सर्वसामान्य मुंबईकरांना बेस्ट बसमधून तर पुणेकरांना पीएमपीएमएल बसमधून प्रवास करता येणार आहे. आतापर्यंत घरपोच मिळणाऱ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद थेट हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन घेता येणार आहे. थिएटर्सवरच्या खुर्च्यांची धूळ आता हटणार आहे. जिममध्ये जाऊन व्यायाम करता येणार आहे तर सलून, स्पा आणि पार्लरचं शटरही उघडणार आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यभरात लागू असलेले संचारबंदीसह कठोर निर्बंध हे आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या दोन निकषांच्या आधारे पाच स्तरांत शिथिल करण्यात आले आहेत. तसंच याबाबतचा आढावा दर आठवड्याला घेतला जाणार आहे. तुमच्या जिल्ह्यात/शहरात कोणते निर्बंध शिथिल झाले आहेत, जाणून घेऊया.

मुंबई
– जीवनाश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरु राहतील, अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील
– मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील
– हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत खुली रहातील. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा सुरु राहिल. शनिवार आणि रविवार बंद राहतील.
– सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 यावेळेत सुरु राहतील
– खाजगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहिल
– इनडोअर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील
– सिनेमा चित्रीकरणाला स्टुडिओमध्ये परवानगी असेल
– सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्म कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहिल (सोमवार ते शुक्रवार)
-लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठका 50 टक्के उपस्थित राहिल
– कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहिल
– दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहिल

नाशिक 
– दुकानं आणि आस्थापनांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असेल
– दुपारी 4 ते सकाळी 7 पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू राहणार आहे.
– सध्या सुरु असलेला वीकएण्ड लॉकडाऊन कायम असेल. या काळात अत्यावश्यक तसंच वैद्यकीय सेवा, भाजीपाला, दुधाची दुकानं सुरु असतील
– बांधकाम आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार असून कामं दिवसभर सुरु राहणार आहेत.
– सलून, जिम 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत.

कोल्हापूर
– दुकानं सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.
– उद्यानं पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत सुरु राहतील.
– सार्वजनिक कार्यक्रम, सिनेमा थिएटर, मॉल यांना बंदी
– लग्नसोहळ्याला 25 लोकांची उपस्थिती तर अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थिती

सातारा
– जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी
– इतर दुकानं बंदच राहणार

पालघर
– जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहतील
– इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहणार
– हॉटेल, रेस्टॉरंट सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील
– मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह पूर्णपणे बंद राहतील

रायगड
– जिम, स्पा आणि पार्लर दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील
– उद्याने, जॉगिंग पार्क पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील.
– जीवनावश्यक वस्तूंची दुकांनी सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा

सांगली
– जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील
– इतर दुकानं पूर्णपणे बंदच राहतील
– 10 जूनपर्यंत पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या आत आल्यास 14 जूनपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत होण्याची शक्यता

गडचिरोली
– जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आठवडाभर सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील
– इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार दुकानं सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील
– उपाहारगृह, रेस्टॉरंट्सना 50 टक्के क्षमतेने खुली ठेवण्यास परवानगी

अकोला
– सर्वप्रकारची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील
– सरकारी कार्यालयं, हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.
– सलून, स्पा, ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेने खुली करण्यास परवानगी
– लग्नकार्यांना 50 लोकांच्या उपस्थितीची मुभा, अंत्यसंस्काराला २० लोकांना उपस्थित राहता येणार
– जिल्ह्याअंतर्गत वाहतूक नियमित सुरु राहिल
– थिएटर्स, मॉल, नाट्यगृह पूर्णपणे बंद राहतील
– वीकएण्डला (शनिवार-रविवार) जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहतील

वर्धा
– जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानं दररोज सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार
– इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरु ठेवता येणार
– कार्यलयीन उपस्थितीला 50 टक्क्यांची परवानगी
– शिवभोजन थाळी, हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के आसनक्षमतेने सुरु ठेवण्यास मुभा

नंदुरबार
– लग्नसमारंभासाठी 100 जणांना परवानगी
– सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हॉलच्या 50 टक्के क्षमतेने परवानगी
– लस घेतल्यांसाठी सलून सुरु
– रात्रीची संचारबंदी कायम
– शनिवार आणि रविवारचा जनता कर्फ्यू बंद

यवतमाळ
– शासकीय आणि खासगी कार्यालयं 100 टक्के क्षमतेने सुरु राहणार
– लग्नसमारंभ आणि अंत्यविधीला लोकांच्या उपस्थितीची मर्यादा
– मॉल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार
– सार्वजनिक वाहतूक सुरु, मात्र उभ्याने प्रवास करता येणार नाही

Leave A Reply

Your email address will not be published.