इसमाने मागवली होती सफरचंदे, तर त्याला मिळाला iPhone, मात्र कोणाकडूनही झाली नाही कोणतीही चूक

अनेकदा ऑनलाईन मागवलेल्या वस्तूंच्या जागी खराब झालेले सामान किंवा वेगळेच काहीतरी मिळाल्याच्या बातम्या येतात, मात्र इथे या व्यक्तीने ऑनलाईन सफरचंदे मागवली होती आणि त्याच्या हातात iPhone SE पडला.

0 19

आपण अनेकदा ऐकतो की एखाद्या ऑनलाईन ऑर्डरमध्ये (Online order) एका गोष्टीच्या जागी वेगळेच काहीतरी मिळते किंवा खराब (defective) झालेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत (customers) काही चुकीने पोहोचतात. मात्र एका व्यक्तीचे नशीब (luck) मात्र अशाच एका घटनेमुळे फळफळले आहे. सदर इसमाने ऑनलाईन सफरचंदे (apples) मागवली होती, मात्र त्याला iPhone SE मिळाला आणि या प्रकारात कंपनीकडून (company) कोणतीही चूक (mistake) झाली नाही. जाणून घ्या काय आहे हा पूर्ण प्रकार.

कंपनीच्या जाहिरातीच्या धोरणामुळे उघडले नशीब

इंग्लंडचा रहिवासी असलेला हा इसम त्यावेळी आश्चर्यचकित झाला जेव्हा त्याला टेस्कोमधून एक पिशवी सफरचंदे मागवल्यानंतर आयफोनचे नवे मॉडेल मिळाले. मात्र झाल्या प्रकारात कंपनीकडून कोणतीही चूक झालेली नाही, तर कंपनीच्या सुपर सब्स्टिट्यूट प्रमोशनचा हा एक भाग होता. निक जेम्स असे या भाग्यवान इसमाचे नाव आहे. त्याने आपली ऑर्डर स्वतःच घेतली होती तेव्हा तिथल्या एका कर्मचाऱ्याने त्याला सांगितले की पिशवीत त्याच्यासाठी एक सरप्राईज आहे. यानंतर जे झाले ते चकित करणारे होते.

सफरचंदेही मिळाली आणि iPhone SE सुद्धा

निकला एक पिशवीभर सफरचंदे खरेदी केल्याबद्दल मोफत iPhone SE देण्यात आला. सोबतच त्याने मागवलेली सफरचंदेही त्याच्यापर्यंत पोहोचवली गेली. निकने टेस्को आणि टेस्को मोबाईलचे आभार मानत ही घटना आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केली आहे. द मिररला त्याने सांगितले की त्यांना अशा सरप्राईजची काहीच कल्पना नव्हती. त्याला वाटले होते की त्यात ईस्टर एगसारखे काही असेल. आयफोन पाहून तो चकितच झाला.

या कंपनीच्या डिव्हाईज दिल्या जात आहेत मोफत

टेस्को मोबाईल या आठवड्यात एक प्रोमोशन कँपेन चालवत आहे ज्याअंतर्गत अॅपल कंपनीचे आयफोन्स, एअरपॉड्स आणि सॅमसंग कंपनीचे डिव्हाईज मोफत दिले जात आहेत. यासाठी कंपनीने रँडम पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.