‘मढ्यावरचं लोणी खाणारं हे…’, केदार शिंदेनी व्यक्त केला तीव्र संताप

0 10

मुंबई : कोरोना पोहोचला नाही असं कोणतं क्षेत्र किंवा कोणताही भाग उरला नाही. देशभरात कोरोनाने (corona pandemic) अक्षरश: थैमान घातलं आहे. वैद्यकीय सुविधांचा अभावही निर्माण झाला आहे. जमेल तशा मदतीसाठी जो तो पुढे येत आहे. याच कोरोनाला आवर घालण्यासाठी राज्यासह देशातील काही भागात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. पण काही राज्यात नुकत्याचं (Bengal elections) निवडणूका पार पडल्या, या गंभीर काळातही मोठ्या रॅली, सभा घेण्यात आल्या अर्थात त्यात सगळेच राजकीय पक्ष सामील होते. तर दुसरीकडे आयपील मॅचेसही (IPL2021) धुमधडाक्यात सुरु होत्या. पण सामान्य माणूस मात्र घरात कोंडून पडलाय. याच विषयावर दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी खरमरीत ट्विट केलं आहे.

नेहमीच आपल्या निर्भिड आणि स्पष्ट विचारांसाठी ओळखले जाणारे मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आयपीएल आणि राजकीय सभांवर आगपाखड केली आहे. त्यांनी केलेल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलय, ‘याक्षणी बक्कळ पैसा कमवणारे म्हणजे..#RanveerSingh. आणि त्याच्या जाहीरातींच्यामध्ये दाखवले जाणारे #ipl वाले.. दिल्लीच्या व अहमदाबादच्या सरणावर ipl जोरात..’

 

कोरोणाच्या भयंकर संकटानंतरही आयोजीत केलेल्या मॅचेसवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नुकतेच काही खेळाडू हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याची बातमी समोर आली आणि काही खेळाडूंना दवाखान्यात भर्तीही कराव लागलं आहे. त्यामुळे बायोबबल या प्रक्रियेचा फज्जा उडाल्याचं समोर आलं, त्यावरही केदार शिंदेंनी भाष्य केलं आहे.

 

पुढील ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘काय गं# बायोबबल?  एव्हढी खबरदारी घेतली म्हणता तरी, #IPL2021 खेळाडू आलेच ना #coronapositive?? मढ्यावरचं लोणी खाणारे हे क्रिकेटमंडळ… कर्म सगळी उत्तरं चोख देणार…’

केदार शिंदेंच्या या ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे. तसंच आता बीसीसीआय (BCCI)  ने यावर्षीच्या आयपीएल मॅचेस तुर्तास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.