धनुर्विद्या स्पर्धेमध्ये मिहिर अपार याने पटकावला महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक

0

बुलडाणा:

नगर येथे संपन्न झालेल्या १९ व्या सब ज्युनियर राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत येथील द्रोणाचार्य अॅकॅडमी व प्रबोधन विद्यालयाचा विद्यार्थी मिहिर नितीन अपार याने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.या स्पर्धेत मिहिर अपारने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात पन्नास
मीटर राऊंडमध्ये ६८९ गुण घेऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याची छत्तीसगड (रायपूर) येथे संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता त्याची निवड झालेली आहे.
क्रिडाक्षेत्रामध्ये त्याने उत्तुंग यश प्राप्त केल्याबद्दल विदर्भ प्रांताध्यक्ष प्रमोद पवार, जिल्हा संपर्क प्रमुख रवि वाघ,जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे,नितीन अपार,तालुका अध्यक्ष सुनिल घावट व संपुर्ण जिल्हयाभरातील शिक्षक सेनेच्या आदि पदाधिकारी यांनी सोशलमिडियावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

मिहिर अपार याने अथक परिश्रमाने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक प्रात करून राज्यात जिल्हाच्या नावाचा मानाचा तुरा रोवला आहे.

” धनुर्विद्या हा प्राचीन काळापासून चालत आलेला क्रीडा प्रकार आहे.
भारतीय संस्कृतीमधील रामायण-महाभारतामधील युद्धे धनुर्विद्येवरच आधारित होती. या क्रीडा प्रकारात भारताला भविष्यामध्ये ऑलिम्पिक पदक मिळवून देण्यासाठी मिहिर अपारला नक्कीच यश मिळो, त्याच्या क्रिडाक्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शिक्षक सेनेच्या वतीने शुभेच्छा ! ”

– सुनिल घावट,
तालुका अध्यक्ष शिक्षक सेना शेगांव

Leave A Reply

Your email address will not be published.