मुंबई, ठाण्याला हुडहुडी.. ; यंदाच्या हिवाळय़ातील नीचांकी तापमान
उत्तरेकडून येणाऱ्या बाष्पामुळे राज्याच्या बहुतांश भागांत दोन दिवसांपर्यंत पावसाळी स्थिती होती.
मुंबई, पुणे : मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबईत तर सोमवारी यंदाच्या हिवाळय़ातील नीचांकी तापमानाची नोंद झाली़ त्यामुळे मोठय़ा प्रतीक्षेनंतर मुंबई, ठाण्यातील नागरिकांनी थंडीचा अनुभव घेतला.
प्रामुख्याने मुंबई परिसर आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा घसरल्याने या भागाला हुडहुडी भरली आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.