प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचा राग, प्रियकरानं भेटायला बोलावलं अन्…; वर्ध्यातील घटना

आर्वी शहरातील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेम होतं. घटनेच्या दिवशी हा तरुण आणि त्याची अल्पवयीन प्रेयसी यांटी भेट झाली होती.

0 25

वर्धा:

वर्ध्यातील आर्वी येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेचा चार दिवसांनी उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी प्रेमप्रकरणाचा धागा पकडून आरोपीला शोधून अटक करण्यात आली आहे.

अजय आत्राम असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचं आर्वी शहरातील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेम होतं. घटनेच्या दिवशी हा तरुण आणि त्याची अल्पवयीन प्रेयसी यांटी भेट झाली होती.

त्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलगी एका मुलासोबत बोलत असल्याच्या कारणातून दोघांत वाद झाला आणि त्यानंतर प्रियकराने मुलीला जवळ असणाऱ्या विहीरीत ढकलून तिची हत्या केली. या प्रकरणाचा उलघडा चार दिवसांनंतर झाला आहे. चार ते पाच दिवसांनी या खुनाचा उलगडा होऊन मारेकरी प्रियकराला पोलिसांनी अटक केली.

वर्ध्यातील कारंजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील पीडितेवर अत्याचार करुन तिला गोळ्या देत गर्भपात केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. या घटनेने समाजमन्न सुन्न झाले. अवघ्या दहाव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या पीडितेला कमलेश नामक युवकाने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे आमिष देत तिच्यावर तब्बल दोन वर्षे अत्याचार केला.

यात पीडितेला गर्भधारणा झाली. दरम्यान कमलेशने तिला अनधिकृतरित्या गोळ्या देत गर्भपात केला. पीडितेने लग्नाची गळ घातली असता तिला वारंवार त्रास देत मारण्याची धमकी दिली. तसेच लग्न करण्यास नकार दिला. अखेर पीडितेने याबाबतची तक्रार कारंजा पोलिसात दिली.

पोलिसांनी याप्रकरणी कमलेशविरुद्ध कलम ३७६, ३, ३१३,३२३, ५०६ भादवी सहकलम ४,६ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.