मोबाईलचा स्फोट झाल्याने बॅगला लागली आग, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

चीनमध्ये एका व्यक्तीच्या बॅगेतच मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

0 23

मुंबई: तुम्ही अनेकदा मोबाईलचा स्फोट झाल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. मात्र मोबाईल वापरत असताना त्याचा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. चीनमध्ये मोबाईलच्या स्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका व्यक्तीच्या बॅगेत मोबाईलचा स्फोट होतो आणि अचानक आग लागते.

ही व्यक्ती गर्दीतून आपल्या मित्रासोबत जात असताना ही दुर्घटना घडली. ५१ सेकंदाचा हा व्हिडिओ साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने बुधवारी शेअर केला. हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून सारेच हैराण झाले आहेत. या व्हिडिओत दिसते की एक व्यक्ती भररस्त्यात आपल्या  मित्रासोबत चालत चालली आहे. त्या व्यक्तीच्या पाठीवर बॅग आहे. या बॅगला अचानक आग लागते. आग लागल्याने घाबरलेली ती व्यक्ती पाठीवरची बॅग जमिनीवर फेकते. यात आगीच्या ज्वाळाही दिसत आहेत.

पहा व्हिडीओ 

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, जेव्हा ही व्यक्ती रस्त्यावर चालत होती तेव्हा तिला स्फोटाचा आवाज ऐकू गेला. मात्र त्या व्यक्तीला समजले नाही की स्फोट नेमका कुठे झाला. मात्र लगेचच त्याच्या लक्षात येतं की स्फोट त्याच्या बॅगमध्ये झाला आणि बॅगमध्ये आग लागली आहे. बॅगमध्ये फोन होता. ज्याचा स्फोट झाल्याने ही आग लागली.

Leave A Reply

Your email address will not be published.