कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरलेल्या कुंभमेळ्यातील साधू-संतांचे मोदींनी मानले आभार! ट्विट करून म्हणाले..

0 2

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता कुंभमेळ्यामुळे कोरोनाबाबत अजून चिंता वाढल्याची माहिती समोर येत आहे. महाकुंभ आणि शाहीस्थानामुळे कोरोनाचा उद्रेक झाला आहे. तेथे मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हा कुंभमेळा कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरत आहे. मात्र असे असले तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कुंभमेळ्यातील साधू-संतांचे आभार मानले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विट हँडलवरून एक ट्विट केले आहे. ज्यात ते म्हणाले की, “आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी जी यांच्यासोबत आज फोनवर बोलणं झालं. सर्व संतांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला प्रत्येक प्रकारचं सहकार्य करत आहेत. यासाठी मी संतांचे आभार व्यक्त केले.” अशा आशयाचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

तसेच मोदी पुढे म्हणाले की, “मी विनंती केली, की दोन शाही स्नान झाले आहेत आणि इथून पुढे कोरोनाचं संकट पाहाता कुंभ प्रतिकात्मकच ठेवलं जावं. यामुळे या संकटाविरोधातील लढाईला एक ताकद मिळेल.”

दरम्यान, निर्वाणी आखाड्याच्या प्रमुखांसह जवळपास ६८ साधू संतांना कोरोनाची लागण झाली आहे. निर्वाणी आखाड्याचे प्रमुख ६५ वर्षीय महामंडलेश्वर कपीलदेव दास यांचे हरिद्वारमधल्या एका खासगी रुग्णालयात कोरोनानं निधन झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.