शेगांवातील मोकाट कुत्र्यांनी चढविला माकडावर जीवघेणा हल्ला

0 2

शेगांव :
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना सामाजिक बांधिलकी जोपासण्यासोबतच पशुपक्ष्यांवर अचानक उद्भवलेल्या जीवघेण्या संकटातुन प्राण वाचविण्यासंदर्भात तसेच वन्यजीव प्राण्यांविषयी मनामध्ये असलेली भुतदया जोपासत जखमी प्राण्यांना सुरक्षित असेपर्यंत अभय देण्याचा प्रयत्न शिक्षक सेना मित्र परिवाराच्यावतीने करण्यात येत आहे.
शेगांवमध्ये नुकतेच माकडावर गावातील मोकाट कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला चढविला व सदर घटनेमध्ये माकड गंभीररित्या जखमी झाले, याप्रसंगी शिक्षक सेनेचे गजानन वानखेडे उपस्थित असल्यामुळे त्यांनी माकडाला कुत्र्यांच्या हल्ल्यातुन वाचविण्यात यश प्राप्त कले व माकडाला घरी आणले, तृष्णातृप्ती व खायायले देऊन माकडाचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला परंतू कुत्र्यांनी माकडावर तीव्र हल्ला चढविलेला असल्यामुळे माकडाचे प्राण वाचविण्यात गजानन वानखेडे हे यश प्राप्त करु शकले नाहीत.
गंभीररित्या जखमी असलेल्या माकडाने प्राण सोडल्यामुळे अखेर गजानन वानखडे यांनी माकडावर अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेऊन माणुसकीचे दर्शन घडविले.
थोडक्यात सविस्तर वृत्त असे कि, दि.१७ एप्रिल रोजी शनिवारच्या सकाळी ठिक ५.०० वाजता गावातील काही मोकाट कुत्र्यांनी एका माकडावर जीवघेणा हल्ला चढवला. त्या हल्ल्यात माकड गंभीररीत्या जखमी झाले.गंभीर जखमी झालेले माकड गजानन वानखडे यांच्या दृष्टीस पडल्यामुळे त्यांनी त्या माकडाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून आपल्या स्वतःच्या घरी आणले व अन्नपाणी करून माकडाचे प्राण वाचविण्यासाठी सर्वोतोपरी अथक प्रयत्न केले परंतू माकड गंभीररित्या जखमी झालेले असल्यामुळे त्याचे प्राण वाचविण्यात त्यांना यश प्राप्त करू शकले नाही.

गंभीर जखमी झालेले माकड घटनेच्या दोन तासांनी दुर्दैवाने मृत झाल्यामुळे हनुमंताचे रूप मानून व योगायोगाने शनिवार असल्यामुळे मृत्यू पावलेल्या माकडाचा अंतिम संस्कार करण्याचा निर्णय गजानन वानखेडे यांनी घेतला त्यांनी नगरपालिकेतील मित्र प्रफुल्ल तायडे व राम सारवान यांना दूरध्वनी करून या संदर्भात माहिती दिली व बोलावून घेतले.
सदर माकडावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जेसीबीद्वारे मोठा खड्डा करण्यात आला व माकडाला लाल वस्त्र चढवून त्याची विधिवत पूजा करण्यात आली. शेवटी फुले, हार अर्पण करून या माकडाचे अंतिम संस्कार करण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले.
संचारबंदींचा आदेश व कोरोना संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता प्रफुल्ल तायडे व राम सरवान यांच्या मदतीने कोरोना नियमांचे पालन करून अंतिम संस्कार पार पाडण्यात आले.


माकडांवर अंतिम संस्कार करून वन्य प्राण्यांविषयी असलेली भुतदया व प्रेम व्यक्त करून माणुसकीचे दर्शन या घटनेतुन शिक्षक सेनेचे तालुका अध्यक्ष गजानन वानखेडे यांनी घडविलेले आहे.
या माणुसकीच्या प्रसंगाची परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
प्राणी असो कि मानव, मानवतेच्या दृष्टीकोनातून सर्वाचे प्राण हे महत्वाचे व अमुल्य आहे,त्यामुळे शक्य होत असल्यास सर्वानी भुतदया जोपासून सामाजिक कार्य करावे आणि मानवता हा एकमेव धर्म जोपासण्यात यावा.

– गजानन वानखडे
तालुका अध्यक्ष, शिक्षक सेना संग्रामपुर

माकडावर अंतिम संस्कार करतांना सामाजिक कार्यकर्ते

Leave A Reply

Your email address will not be published.