MS Dhoni vs Virat Kohli IPL 2021: एमएस धोनी की विराट कोहली, कोण आहे सर्वोत्तम मॅच-विनर? पहा काय सांगतात स्टॅट्स

एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचा ब्लॉकबस्टर सामना 25 एप्रिल रोजी रंगणार आहे. पण कोहली आणि धोनीमध्ये आयपीएलचा खरा मॅच-विनर कोण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. पहा काय सांगते त्यांची आकडेवारी.

0 17

MS Dhoni vs Virat Kohli IPL 2021: एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचा (IPL) ब्लॉकबस्टर सामना 25 एप्रिल रोजी रंगणार आहे. या सामन्याच्या निमित्त धोनी विरुद्ध कोहली, भारताच्या दोन महान कर्णधारांमध्ये काट्याची टक्कर चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे.

या मोसमात विराट कोहली आणि एमएस धोनी हे दोघेही आघाडीवरुन संघाचे नेतृत्व करत आहेत. आरसीबीने (RCB) सलग चार सामने जिंकून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे तर सीएसकेला  (CSK) आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले असून त्यांनी सलग तीन सामने जिंकले आहेत. पण कोहली आणि धोनीमध्ये आयपीएलचा खरा मॅच-विनर कोण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. पहा काय सांगते त्यांची आकडेवारी.

आयपीएलमधील विराट कोहली-एमएस धोनीची आकडेवारी

आयपीएलच्या सुरुवातीपासून फक्त एक फ्रँचायझीचे (आरसीबी) प्रतिनिधित्व करणारा कोहली एकमेव सक्रिय खेळाडू आहे. एक दशकाच्या कारकीर्दीत त्याने आयपीएलमध्ये 6000 धावांचा डोंगर उभारला आहे. या अविश्वसनीय खेळीत पाच शतक आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे, धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. तो स्पर्धेत 200 किंवा त्याहून अधिक सामने खेळणार्‍या तीन क्रिकेटपटूंपैकी एक आहे. धोनी आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला असून 100 पेक्षा जास्त सामने जिंकणारा तो एकमेव कॅप्टन आहे. एकूणच त्याने 192 पैकी 113 सामने जिंकले आहेत. दरम्यान, कोहलीने कर्णधार म्हणून 59 सामन्यात संघाचे विजयी नेतृत्व केले आहे.

इतकंच नाही तर धोनी आयपीएलमध्ये आरसीबीविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. आत्तापर्यंत त्याने 28 सामन्यांत 141.9 च्या स्ट्राइक रेटने 823 धावा केल्या आहेत. शिवाय, धोनीने आरसीबीविरुद्ध सात नाबाद धावसंख्या देखील नोंदवली आहे. दुसरीकडे, कोहलीही सीएसकेविरुद्ध धावांमध्ये आघाडीवर आहे. सुपर किंग्स विरोधात विराटने 127.26 च्या स्ट्राइक रेटने 887 धावा केल्या आहेत. त्यामुळे, वरील आकडेवारीनुसार विराट आपला गुरु धोनीवर भारी पडताना दिसत आहे पण चेन्नईने आरसीबी विरोधात सर्वाधिक सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.