आनंदाची बातमी: मुंबईत कोरोनाचा डबलिंग रेट वाढला, मृत्यूही घटले

विशेषत: मे महिन्यातील उत्तरार्धात परिस्थिती वेगाने सुधारताना दिसत आहे. कारण, 20 दिवसांत रुग्ण दुपटीचा कालावधी 163 दिवसांवरुन 370 दिवसांपर्यंत जाऊन पोहोचला आहे | Mumbai Coronavirus

0 2

मुंबई: काही दिवसांपूर्वीच राज्यातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतील परिस्थिती वेगाने सुधारत आहे. शहरातील कोरोना रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत लक्षणीय घट झाली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट पीक पॉईंटला असताना मुंबईत दिवसाला 11 हजारापर्यंत रुग्ण सापडत होते. मात्र, आता शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. (Coronavirus patients decreases in Mumbai rapidly)

विशेषत: मे महिन्यातील उत्तरार्धात परिस्थिती वेगाने सुधारताना दिसत आहे. कारण, 20 दिवसांत रुग्ण दुपटीचा कालावधी 163 दिवसांवरुन 370 दिवसांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. याचा अर्थ आता मुंबईतील कोरोनाचा डबलिंग रेट 370 दिवसांचा झाला आहे. तसेच शहरातील मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. यापूर्वी मुंबईत दिवसाला साधारण 70 लोकांचा जीव जात होता. मात्र, मे महिन्यात कोरोना मृतांचे प्रमाण 30 पर्यंत खाली आले आहे.

मुंबईत दिवसभरात 1048 रुग्णांची नोंद

मुंबईत शनिवारी दिवसभरात 1 हजार 048 रुग्णांची नोंद झालीय.मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट होत आहे. तर मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 94 टक्क्यांवर पोहोचलाय. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई शहरासह उपनगरात दिवसभरात 1048 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. तर आतापर्यंत एकूण 6 लाख 59 हजार 899 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. त्यामुळे सध्या मुंबईत 27 हजार 617 रुग्ण सक्रिय आहेत.

पुण्यात सर्वाधिक मृत्यू

राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू हे पुणे जिल्ह्यात झाले आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 16 हजार 755 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तसेच पुण्यातील मृतांच्या आकडेवारीतही मोठा घोळ असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अधिकृत आकड्यापेक्षा पुण्यात अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.