Mumbai: “पुन्हा २६/११!”; पोलिसांना आलेल्या धमकीच्या मेसेजने खळबळ

२६/११ सारखा भयानक हल्ला पुन्हा एकदा करणार असल्याची धमकी

0

Mumbai:  मुंबईतल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा अजूनही पूर्णपणे भरलेल्या नाहीत. मात्र त्या आधीच आता मुंबईवर पुन्हा एकदा हल्ल्याचं सावट पसरलं आहे. सणासुदीच्या काळातच मुंबईमध्ये पुन्हा एकदा हल्ला होणार असल्याच्या धमक्या येत आहेत.

मुंबई पोलिस ट्राफिक कंट्रोल रुमला धमकीचे मेसेज आले आहेत. २६/११ सारखा भयानक हल्ला पुन्हा एकदा करणार असल्याची धमकी मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. कंट्रोल रुमच्या नंबरवर पाकिस्तानमधून हे धमकी वजा मेसेजेस आले आहेत.

या नव्याने होणाऱ्या हल्ल्यामध्ये भारतातलेच ६ लोक मदत करणार आहेत, असंही या धमकीच्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. आत्ताच दहीहंडीची धामधूम थंडावली आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आहे. त्या पाठोपाठ लगेचच नवरात्रौत्सव, दिवाळी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्याच्या धमकीने खळबळ माजली आहे.

सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा मुंबईवर हल्ल्याचं सावट आहे. त्यामुळे आता पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.