पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेशी अश्लील चाळे, इंजिनिअरिंग विद्यार्थ्याला अटक

आरोपी एका प्रसिद्ध फूड डिलीव्हरी कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणूनही काम करत असल्याची माहिती आहे. (Nagpur Student Molesting woman)

0 3

नागपूर : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पादचारी महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. 27 वर्षीय आरोपी हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. नागपुरात भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Nagpur Engineering Student arrested for allegedly Molesting woman on road)

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रस्त्यात अडवले

रस्त्याने जात असलेल्या महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी शिताफीने छडा लावला. सुरज सुधीर मालोदे असे 27 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो एका प्रसिद्ध फूड डिलीव्हरी कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणूनही काम करत असल्याची माहिती आहे.

निर्जन रस्त्यावर अश्लील चाळे

तक्रारदार महिला 22 मे रोजी दुपारी नागपूरमधील जरीपटका भागातून आपल्या घरी जात होती. यावेळी आरोपी सुरजने तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. महिलेने आरडाओरड केल्यामुळे तो पळून गेला.

फूड डिलीव्हरी कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय

पीडित महिलेने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. भरदुपारी घडलेल्या या संतापजनक घटनेमुळे पोलिसांनी आरोपीला शोधून काढण्यासाठी तपास सुरु केला आणि अटक केली. आरोपी हा अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असल्याचं समोर आलं आहे. दोन आठवड्यापूर्वीच तो फूड डिलीव्हरी कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला लागला होता.

मुंबईत बॉलिवूड फोटोग्राफरवर बलात्काराचा आरोप

दरम्यान, बॉलिवूड फोटोग्राफरवर मुंबईतील मॉडेलने बलात्काराचा आरोप केला आहे. अंधेरीत राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीने वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार नोंदवली आहे. फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियन याच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका प्रख्यात चित्रपट निर्मात्याचा मुलगा, बॉलिवूड टॅलेंट मॅनेजर आणि एका निर्मात्याचाही समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.