25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, नागपुरात वरिष्ठ डॉक्टरला बेड्या

नागपूरमध्ये मानकापूर परिसरातील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. (Nagpur Senior Doctor Molested Lady)

0 63

नागपूर : वरिष्ठ डॉक्टरने सहकारी महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. 25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी वरिष्ठ डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. (Nagpur Senior Doctor allegedly Molested 25 years old Lady Doctor in COVID Hospital)

नागपूरमध्ये मानकापूर परिसरातील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. सिनीअर डॉक्टरने 25 वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. चेंजिंग रुममध्ये बोलवून त्यांनी डॉक्टरशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे.

आरोपी डॉक्टरला अटक

पीडित डॉक्टरच्या तक्रारीनंतर डॉक्टर नंदू रहांगडाले यांच्यावर मानकापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी डॉक्टरला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉक्टरी पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

औरंगाबादेत कोरोनाग्रस्तावर डॉक्टरचा अतिप्रसंग

दरम्यान, रात्रीच्या वेळी कोविड सेंटरमध्ये राऊंडवर असलेल्या डॉक्टरने कोरोनाबाधित महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये उघडकीस आला होता. महिलेने आरडाओरड करताच डॉक्टरने तिथून पळ काढला होता.

मध्य प्रदेशात विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका खासगी रुग्णालयाच्या कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाग्रस्त विवाहित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला होता. कोरोनाची लागण झाल्यानंतर संबंधित विवाहितेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने तिला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. रात्रीच्या सुमारास विवेक लोधी नावाचा वॉर्डबॉय महिलेच्या कक्षात आला. महिलेला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्या खोलीत कोणीही नव्हतं. याचा गैरफायदा घेत वॉर्डबॉयने महिलेसोबत गैरकृत्य करण्यास सुरुवात केली, अशी तक्रार पीडितेच्या मुलाने केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.