नालासोपाऱ्यात हॉस्पिटलमध्येच 21 वर्षीय नर्सचा विनयभंग, आरोपी डॉक्टर परागंदा

नालासोपारा पूर्व भागातील संतोष भुवन यूपी नाका येथील आरती हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. डॉ. सुशील मिश्रा असे वासनांध आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

0 17

नालासोपारा : मुंबईजवळच्या नालासोपारा भागात डॉक्टरनेच नर्सचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. डॉक्टरने हॉस्पिटलमध्ये 21 वर्षीय परिचारिकेचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी डॉक्टर परागंदा झाला आहे. (Nalasopara 21 years old Nurse allegedly molested by Doctor in Aarti Hospital)

नेमकं काय घडलं?

नालासोपारा पूर्व भागातील संतोष भुवन यूपी नाका येथील आरती हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. डॉ. सुशील मिश्रा असे वासनांध आरोपी डॉक्टरचे नाव आहे. आरती हॉस्पिटलमध्ये तो पार्टनरशिपमध्ये मॅनेजमेंटचे काम पाहतो. रुग्णालयातील 21 वर्षीय नर्सचा त्याने विनयभंग केल्याची आरोप आहे.

पोलिसात गुन्हा, ओरीप डॉक्टर फरार

पीडित नर्सच्या तक्रारीवरून डॉक्टर सुशील मिश्रा याच्या विरोधात नालासोपाऱ्यातील तुलिंज पोलीस ठाण्यात विनयभंग, धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी डॉक्टर फरार झाला आहे.

नागपुरात वरिष्ठ डॉक्टरकडून अतिप्रसंग

दरम्यान, वरिष्ठ डॉक्टरने सहकारी महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. 25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला होता. या प्रकरणी वरिष्ठ डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या.

नागपूरमध्ये मानकापूर परिसरातील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. सिनीअर डॉक्टरने 25 वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. चेंजिंग रुममध्ये बोलवून त्यांनी डॉक्टरशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला गेला.

Leave A Reply

Your email address will not be published.