नंदुरबारमधून पुणे, पंढरपूर, नाशिक, धुळे, जळगावसाठी बस

0 2

नंदुरबार : अनलॉकनंतर राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) (Maharashtra state road transport) नंदुरबार आगारातून सोमवार (ता. ७)पासून पुणे, पंढरपूर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव आणि धुळे येथे जाण्यासाठी एसटीच्या (Nandurbar unlock) फेऱ्या सुरू होणार आहेत, अशी माहिती नंदुरबार आगारप्रमुख मनोज पवार यांनी दिली.

कोरोनाकाळात (Coronavirus) दीड वर्षापासून सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी ठरलेली एसटीची चाके थांबली होती. १ जूनपासून प्रशासनाने अनलॉक जारी केल्यानंतर एसटी सेवा कार्यान्वित करण्यात आली. नंदुरबार आगारातून सोमवारपासून पुणे सकाळी साडेपाच, पंढरपूर बस पाचला रवाना होईल. नाशिकसाठी सकाळी सहा, सात, आठ, नऊ, दहा, साडेअकरा, साडेबारा, दुपारी अडीच व साडेतीनला, मुक्कामी नंदुरबार- नाशिक मुंगारीमार्गे सायंकाळी सातला सुटेल. नंदुरबार-औरंगाबाद सकाळी आठ आणि दुपारी साडेतीन, नंदुरबार- जळगाव-अमळनेरमार्गे सकाळी पावणेसात व दुपारी सव्वाला धुळेमार्गे धावणार आहे.

धुळेसाठी बावीस बस

धुळ्यासाठी दिवसभरात २२ बस धावणार आहेत. त्यात पहाटे साडेपाच, सकाळी साडेसहा, साडेसात, साडेआठ, नऊ, साडेनऊ, साडेदहा, अकरा, साडेअकरा, दुपारी बारा, साडेबारा, एक, दीड, दोन, अडीच, तीन, साडेतीन व चार, सायंकाळी पाच व सहा आणि सात व रात्री आठला मुक्कामी, नंदुरबार- शहादा सकाळी सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा आणि दुपारी साडेबारा, दीड, अडीच, साडेतीन, साडेचार आणि सायंकाळी पाचला बस सुटणार आहे. नंदुरबार-तळोदा सकाळी साडेसहा, साडेसात, साडेआठ, साडेनऊ, साडेदहा, साडेअकरा, दुपारी साडेबारा, दीड, अडीच, साडेतीन, साडेचार आणि सायंकाळी साडेपाचला बस सुटणार आहे. याशिवाय नंदुरबार-शिरपूर सकाळी साडेसात व दुपारी साडेबारा, नंदुरबार-अक्कलकुवा सकाळी आठ आणि दुपारी एक, तर नंदुरबार-अमळनेर सकाळी आठ, नंदुरबार- नवापूर सकाळी साडेआठ, दुपारी साडेबारा, सायंकाळी पाचला मुक्कामी बस सुटेल.

१५ हजार किमीचे नियोजन

कोरोना नियमावलीचे पालन करत सोमवारपासून ३५ टक्के प्रवाशांच्या उपस्थित सर्व बस सोडण्यात येणार आहेत. तसेच १५ हजार ६५७ किलोमीटरचे नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी व रविवारी नंदुरबार जिल्ह्यात ‘जनता कर्फ्यू’मुळे बस बंद होत्या. मात्र, १ ते ३ जूनदरम्यान ११ हजार किलोमीटर ५० टक्के क्षमतेने बस धावल्या. या माध्यमातून नंदुरबार आगाराला दोन लाख ८० हजारांचे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती नंदुरबार आगारप्रमुख पवार यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.