आश्रमशाळेसाठी शिक्षण सेतू अभियान

0 2

नवलनगर (नंदुरबार) : कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सेतू अभियान (Aadivashi school shikshan setu abhiyan) राबविण्याचा महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने निर्णय घेतला आहे. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमध्ये नियमित शिक्षण केव्हा सुरू होईल, याविषयी अनिश्चितता आहे. दरम्यानच्या काळात आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक (Nandurbar Aadivashi student) नुकसान होऊ नये, यासाठी विभागाकडून अभियान राबविले जाणार आहे. (nandurbar-news-marathi-news-aadivashi-Ashram-school-Shikshan Setu Abhiyan)

विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये आणि पोषणामध्ये खंड पडू नये व ते पूर्वीप्रमाणे निरंतर राहावे, यासाठी या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण सेतू अभियान राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. आश्रमशाळा नियमित सुरू होईपर्यंत हे अभियान राबविणार आहे. या अभियानात शाळा बंद असतानासुद्धा कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून (Education) वंचित राहू नये म्हणून भौतिक स्वरूपात शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य व गावपातळीवर पूरक सेवा पुरविणे, जेथे शिक्षकांमार्फत सेवा पुरवणे शक्य नाही केवळ तेथे शिक्षणमित्रांच्या सहाय्याने सेवा पुरविल्या जाणार आहेत.

विशेष उपाययोजना

शक्य तेथे ऑनलाइन पद्धतीने पूरक शिक्षण देणे, पूरक पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी विशेष उपाययोजना करणे व शासकीय आश्रमशाळेतील व एकलव्य निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना डी.बी.टी. अदा करणे.

विविध स्तरावर समित्या

आदिवासी विकास यांच्या स्तरावर कार्यकारी आयुक्त समिती, प्रकल्प अधिकारी स्तरावर संनियंत्रण समिती, शासकीय अनुदानित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक स्तरावर अंमलबजावणी समिती, आयुक्त आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या स्तरावर मानांकन समिती असणार आहे. अभियानाची प्रमुख जबाबदारी आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीची सहा सदस्यीय समिती असणार आहे. कार्यकारी संचालक क्वेस्ट मुंबई हे सदस्य सचिव असणार आहेत.

..असे आहेत टप्पे

मानांकन समितीचे गठण करणे, २८ मे २०२१ पर्यंत पालक संस्था आणि गावे यांचे नियोजन पूर्ण करणे व प्रकल्पस्तर, शाळास्तर समितीची स्थापना २ जूनपर्यंत करणे, मानांकनप्रक्रिया पूर्ण करून सॉफ्ट कॉपी स्वरूपात प्रत्येक प्रकल्प पातळीवर ५ जूनपर्यंत पोचविणे. प्रकल्पपातळीवर आवश्यकतेनुसार मुद्रण करून घेऊन शैक्षणिक साहित्य पालक संस्थेकडे १० जूनपर्यंत पोचविणे. प्रकल्पपातळीवर शिक्षणमित्र यांचे १५ जूनपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करणे. शिक्षण सेतू अभियानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी १५ जूनपर्यंत करणे. अंदाजित १५ ऑगस्टपर्यंत अभियान नियमित शाळा सुरू होईपर्यंत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राबविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.