नाशिक : रविवार कारंजा येथे राहणाऱ्या महिलेवर त्र्यंबकेश्वर आणि निफाड येथे बलात्कार

0 46

नाशिक : नाशिक शहरातील रविवार कारंजा येथे राहणाऱ्या एका महिलेवर ४४ वर्षीय इसमाने बलात्कार केला तसेच तिचे आक्षेपार्ह परिस्थितीतील फोटो आणि व्हिडीओ काढून बदनामीची धमकीही दिली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीस रविवारी (दि. २३ मे) रोजी अटक करण्यात आली आहे.

महिलेने दिलेली फिर्याद आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी नितीन उर्फ नाना वसंत वाघ (वय ४४, राहणार: शिवनेरी सोसायटी, वावरे लेन, नाशिक) याची आणि सदर महिलेची एकमेकांशी ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत वाघ याने सदर महिलेच्या घरी तसेच निफाड आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी लॉज घेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारी’रिक संबंध ठेवले. त्याचप्रमाणे तिचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो तसेच व्हिडीओ काढून तिची बदनामी करण्याची धमकीही दिली.

सप्टेंबर २०२० ते १९ मे २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कोल्हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.