कोरोना योद्ध्याची भूमिका बजावणाऱ्या होमगार्डचं मानधन थकलं, नाशिकच्या 400 जणांवर आर्थिक संकट

नाशिक जिल्ह्यात कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून करणाऱ्या 400 होम गार्डचं मानधन थकल्याची माहिती आहे. मानधन थकल्यानं होमगार्डसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

0 6

नाशिक: मार्च 2020 पासून भारतावर कोरोना विषाणू संसर्गाचं संकट आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी देशात पहिल्या लाटेत देशपातळीवर लॉकडाऊन करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र सरकारनं ब्रेक द चैनचे निर्बंध लागू केले. लॉकडाऊनच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांनी समर्थपणे पार पाडली. तर, या काळात गृहरक्षक दलाचे जवान म्हणजेच होमगार्ड यांनी देखील पोलिसांबरोबर बंदोबस्ताचं काम केलं आहे. मात्र, कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या नाशिक येथील होम गार्डचं मानधन थकल्याचं समोर आलं आहे. (Nashik Home Guard remuneration pending more than one month facing trouble)

नेमकं प्रकरण काय?

नाशिक जिल्ह्यात कोव्हिड योद्धे म्हणून काम करणाऱ्या होमगार्डसचे मानधन थकले आहे. जिल्ह्यातील जवळपास 400 होमगार्डसचे मानधन थकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे 52 दिवसांचे मानधन थकले आहे.

होमगार्ड यांच्यावर आर्थिक संकट

पोलिसांसोबत कोरोना काळात कायदा सुव्यवस्थेसाठी होमगार्डसंनी रस्त्यावर उभे राहून जबाबदारी पार पाडली आहे. मात्र, मानधन थकल्यानं जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या होमगार्डसवर उपासमारीची वेळ आलीय.

नाशिक स्मार्ट सिटीचा कारभार सुमंत मोरे यांच्याकडं

नाशिक स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल आणि लोक प्रतिनिधी यांच्यामध्ये संघर्ष होत होता. त्यामुळे नाशिकच्या नगरसेवकांनी प्रकाश थविल यांची बदली करावी, अशी मागणी केली होती. राज्याचे सचिव सीतारम कुंटे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत प्रकाश थविल यांची बदली करण्यात आली आहे. आता सुमंत मोरे नाशिक स्मार्ट सिटीचे नवीन सीईओ असतील. थविल यांची बदली प्रशासकीय बाब असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी नगरसेवकांच्या रेट्या पुढे स्मार्ट सिटी प्रशासन झुकलं असल्याची चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.