नाशिककरांना दिलासा 5 हजार बेड रिकामे, ऑक्सिजनची मागणी घटली; ‘या’ कारणामुळं चिंता कायम

0 11

नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी असून जिल्ह्यात 5 हजार बेड रिकामे असून ऑक्सिजनची मागणी घटली आहे. (Nashik Corona Update)

 

नाशिक: महाराष्ट्रातील महानगर कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत असल्याचं चित्र समोर येतं आहे. नाशिक (Nashik Corona Update) जिल्ह्यात आठवडा भरात कोरोना रुग्णसंख्या आणखी आटोक्यात आली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 5.74 पर्यंत झाला कमी झाला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे शहरातील रुग्णालयांमध्ये 5 हजार पेक्षा जास्त बेड रिकामे आहेत. जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी देखील घटली आहे. नाशिकमधील ऑक्सिजन ची मागणी देखील 20 टक्क्यांनी घटली आहे. 10 हजार रेमडिसिव्हीर साठा देखील उपलब्ध जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहे. हे दिलासादायक चित्र असलं तरी नाशिककरांसमोर मृत्यूदर कमी करणं हे देखील आव्हान आहे. (Nashik Corona Update five thousand beds are available in Nashik corona positivity rate decreased but death rate is high)

नाशिकमध्ये 5 हजार बेड रिकामे

नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचा पॉझिटिव्हीटी रेट 5.74 पर्यंत कमी झाला आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये 5 हजार पेक्षा जास्त बेड रिकामे आहेत.
तर ऑक्सिजन ची मागणी देखील 20 टक्क्यांनी घटली आहे. नाशिकमध्ये 10 हजार रेमडिसिव्हीर साठा देखील उपलब्ध असल्यानं नाशिककरांची चिंता थोडीशी कमी झाली आहे.

म्युकरमायकोसिस संदर्भात महत्वाची बैठक

नाशिक जिल्ह्यात कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमुळे चिंता वाढली होती. म्युकरमायकोसिस संदर्भात महापौर निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. तज्ञ डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी यांच्यात ही बैठक होाणार आहे. म्युकरमायकोसिस नियोजनाबाबत बैठकीत चर्चा होणार असून शहरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

नाशिक कोरोना अपडेट 25 मे 2021

 1. पूर्ण बरे झालेले रुग्ण- 1544
 2. पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 765
 3. नाशिक मनपा- 337
 4. नाशिक ग्रामीण- 411
 5. मालेगाव मनपा- 017
 6. जिल्हा बाह्य- 00
 7. नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4479
 8. एकूण मृत्यु -65
 9. नाशिक मनपा- 38
 10. मालेगाव मनपा- 03
 11. नाशिक ग्रामीण- 24
 12. जिल्हा बाह्य- 00

मृत्यूदर वाढत असल्यानं चिता वाढली

नाशिक जिल्ह्यात दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्ण संख्या घटत आहे. दुसरीकडे मात्र मृत्यू दर वाढत असल्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झालीय. मंगळवारी दिवसभरात 65 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू दर कमी करणं नाशिककरांसमोर आव्हान बनलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.