नाशिकमध्ये काय घडतंय, वाचा तीन मोठ्या बातम्या एकाच क्लिकवर

0 0

नाशिकमध्ये तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका बघता पोलीस प्रशासन हायअलर्टवर पाहायला मिळत आहे. (Nashik three big news Corona Pandemic restriction all you need to know)

नाशिक : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाशिकसह जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून जमावबंदी, संचारबंदी आणि नाकाबंदी सुरू आहे. नाशिक शहरात पहाटे 5 ते संध्याकाळी 6 पर्यंत जमावबंदी लागू असणार आहे. (Nashik three big news Corona Pandemic restriction all you need to know)

या काळात 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच बाजारातील गर्दी बघता बाजारात जाणाऱ्यांसाठी पासची व्यवस्था करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहे. नाशिकमध्ये तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका बघता पोलीस प्रशासन हायअलर्टवर पाहायला मिळत आहे.

राज्याच्या मुख्य सचिवांकडून नाशिक महापालिकेचा आढावा

तर दुसरीकडे नाशिकमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता राज्याच्या मुख्य सचिवांनी नाशिक महापालिकेच्या तयारीचा आढावा घेतला. नाशिकमध्ये ऑक्सिजन पुरवठा पुरेसा आहे का? याबाबतही माहिती घेण्यात आली. नाशिक मनपा दररोज 240 टन ऑक्सिजन पुरेल एवढा साठा ठेवणार आहे. तसेच 27 पीएसए प्लांटची जिल्ह्यात निर्मिती झाल्याची माहिती आहे. तर अधिक तयारीसाठी मनपाने 2000 जम्बो सिलेंडर खरेदीची करण्याची ही तयारी दर्शवली आहे. नाशिक शहरातील कोव्हिडं सेंटरसोबत जम्बो सिलेंडर उपलब्ध केले जाणार आहेत.

 नाशिक महापालिकेची महासभा, विविध विषयांवर चर्चा

नाशिक महापालिकेची आजची महासभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज विशेष महासभा बोलावण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील स्मार्ट कामांबाबत आक्षेप घेतला गेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अर्धवट झालेल्या स्मार्ट सिटीच्या कामांबाबत नगरसेवक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. यावेळी गॅस पाईपलाईन, नोकरभरती, बस सेवा यांसह विविध विषयांवर चर्चा केली जाऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.