Nashik Unlock : नाशिक जिल्ह्यात 7 जूनपासून काय सुरु? काय बंद? विकेंड लॉकडाऊन लागू राहणार

0 5

नाशिक जिल्हा अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात असल्यानं दुपारी 4 ते सकाळी 7 पर्यंत जमावबंदी लागू राहणार आहे. Nashik Unlock

 

नाशिक: कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर महाराष्ट्रात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारनं अनलॉकसाठी पाच टप्पे केले आहेत. नाशिक जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कार्यालये तसेच दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर, दुपारी चार ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. (Nashik Unlock from 7 June what services open or closed)

नाशिकमध्ये विकेंड लॉकडाऊन कायम

जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन कायम राहणार आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने, आस्थापना, दूध आणि भाजीविक्रीला परवानगी देण्यात आली आहे. इतर दिवशी शासकीय आणि खाजगी कार्यालये, जिम, व्यायामशाळा, सलून 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. गर्दी टाळण्यासाठी मॉल्स, थिएटर्स आणि नाट्यगृहे दारं ही बंदच राहणार असली तरी मात्र चित्रीकरणास संध्याकाळी 5 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

नाशिकमध्ये लग्न समारंभासाठी 50 तर अंत्यविधीसाठी 20 नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु असतील. त्यांनतर रात्री 8 पर्यंत पार्सल सेवा सुरु असेल. मैदाने, जॉगिंग ट्रॅक सुरु, बांधकाम आणि उद्योगक्षेत्रांना मोठा दिलासा मिळाला असून उद्योग आणि आयटी सेंटर नियमितपणे सुरु राहतील. तर बांधकांमांनाही दुपारी 4 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेतील बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही.

मालवाहतुकीस नियमितपणे परवानगी देण्यात आली असून 3 जण वाहनात बसू शकतील. स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था यांच्या बैठका, निवडणुका आणि आम सभा यांना कार्यक्रम स्थळाच्या क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती ठेवल्यास परवानगी असेल. कृषी विषयक दुकाने सायंकाळी 4 पर्यंत सुरु असतील. पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत मैदानी क्रीडा प्रकारात मोडणारे खेळ सुरु असतील.

Leave A Reply

Your email address will not be published.