मास्क न घालणं नवरेवाला पडलं महागात; पोलिसांनी दंड ठोठावत दिला कारवाईचा आहेर

0 6

नागपूर :  दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे.  याव्हेरिएंटचे अनेक रुग्ण महाराष्ट्रामध्ये सापडत असून एकाचा मृत्यू देखील झाल्याचं समोर आलं. यामुळे आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरी एका नवरदेवाने वारतीत मास्क न लावल्याने त्याला दंडाचा आहेर देण्यात आला आहे.

संबंधित घटना ही नागपूर येथील आहे. लग्न समारंभ पार पडल्यावर एका नवरदेवाची वरात काढण्यात आली होती. नवरदेव घोड्यावर बसलेला होता आणि त्याच्यासोबत वरातीतील काही मंडळी सुद्धा होती. मात्र कोविडच्या या संकटात चेहऱ्यावर मास्क त्यांनी लावलाच नव्हता. यामुळेच नागपूर मनपाच्या अधिकाऱ्यांनी या नवरदेवाला दंड ठोठावला आहे

नवरदेवच नाही तर वरातीत सहभागी झालेल्या नातेवाईकांनीही चेहऱ्यावर मास्क परिधान केला नव्हता. त्यामुळे या वरातीत सहभागी झालेल्यांवर दंडात्मक कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला आहे. नागपुरातील नेहरूनगर येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत 3 हजार 400 नमुन्यांपैकी 21 केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रकारातील 21 रुग्ण आढळून आले आहेत. हे प्रमाण 0.005 टक्के आहे. त्यामुळे कोरोनाचा डेल्टा प्लस प्रकाराची गंभीर वाढ झाली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.