देवेंद्र फडणवीस यांचं विरोधी पक्षनेते पद पाच वर्षे तरी टिकून राहील का?; राष्ट्रवादीचा फडणवीसांवर हल्लाबोल

0 0

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
पंढरपूर : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे कोरोनाने निधन झाल्यानंतर पंढरपूर येथे पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी भाजपकडून समाधान अवताडे यांना तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र असे असले तरी देखील भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सभा घेण्यात आली होती. त्यावेळी पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

“आम्हाला भारत नानांबद्दल आदर आहे, असं भाजप म्हणतंय. भाजपला भारत नानांबद्दल आदर आहे तर मग ही निवडणूकच का होत आहे? कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नसल्याने अनेकजण महाविकास आघाडीची वाट धरत आहे. हे चित्र पाहता देवेंद्र फडणवीस यांचं विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का?” असा सवाल जयंत पाटील यांनी या सभेत केला आहे.

दरम्यान, नानांच्या भगीरथला मत स्वरुपात आशीर्वाद द्या, असे आवाहन जयंत पाटील यांनी या सभेत पंढरपूर-मंगळवेढाकरांना केले आहे. त्यामुळे पंढरपुर-मंगळवेढा पोटनिवडणूक आता दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.