NEET UG 2022: अधिसूचना कधी प्रसिद्ध होणार? अर्ज कसा करायचा,जाणून घ्या

NEET UG 2022: वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होणार

0

NEET UG 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच NEET UG, 2022 साठी प्रवेश परीक्षेसाठी अधिसूचना जारी करू शकते. पुढील आठवड्यात अधिसूचना निघेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. वास्तविक NEET PG, 2022 चे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर होणं अपेक्षित होतं. परंतु NEET UG चे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होत आहे. शेड्युलला उशीर होण्याचे कारण काय आणि वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर अर्जाची संपूर्ण प्रक्रिया काय असेल हे आज आपण पाहणार आहोत.

NEET UG 2022: वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होणार

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) पुढच्या आठवड्यात NEET UG, 2022 चे वेळापत्रक जारी करू शकते. परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक NTA च्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर प्रसिद्ध केले जाईल. या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्जही करता येणार आहेत. कोणतीही नवीन माहिती आणि अपडेटसाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात.

NEET UG 2022: उशीर का होत आहे?

वास्तविक CBSE, ICSE आणि विविध राज्य मंडळे त्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करत आहेत. त्यामुळे या परीक्षांचा NEET UG, 2022 एकत्र होण्याची भीती बळावली आहे. याशिवाय अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही सुरू आहेत, त्यामुळे बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. यामुळेच NEET UG, 2022 चे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होत आहे.

NEET UG 2022: जूनच्या शेवटी घेतली जाऊ शकते परीक्षा

विविध अहवालांमध्ये असा दावा केला जात आहे की NEET UG, 2022 परीक्षा जूनच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केली जाऊ शकते. असे झाल्यास, ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होतील आणि काउंसलिंग प्रक्रिया सुरू होण्यासाठी सप्टेंबरपर्यंत लागू शकेल. परीक्षा ऑफलाईन (पेन-पेपर) पद्धतीने घेतली जाऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.