नेहरूंनी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देऊन चूक केली -संजय राऊत

0 0

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
बेळगाव । बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ बुधवारी खासदार संजय राऊतांनी सभेला उपस्थिती लावली होती. यावेळी राऊतांनी भाजप आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

पंडित नेहरू यांनी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देऊन चूक केली होती. ती चूक भाजपने दुरुस्त केली ना? मग आता पंतप्रधान मोदींनी बेळगावमध्ये येऊन ही चूकही दुरुस्त करावी, असे संजय राऊतांनी सभेत म्हणले आहे.

तसेच, आईची मुलापासून ताटातूट करण्यासाठी भाजप आणखी काय करणार? भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुम्ही बेळगावात मराठी माणसाला पाडण्यासाठी भाजपच्यावतीने सभा घेणार आहात का? असा सवाल उपस्थित करत, राऊतांनी शुभमचा विजय हा संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना दिलेली भेट असेल. त्यामुळे शुभम शेळके यांचा भरधाव घोडा थांबणार नाही. असे म्हणले आहे.

दरम्यान, बेळगावमध्ये संयुक्त महाराष्ट्र चौकात संजय राऊतांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. पण संजय राऊत या सभेला येण्या आधीच संयुक्त महाराष्ट्र चौकीतील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले गेले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.