लॉकडाऊनमुळे काम मिळेना, लॉजजवळून 5 मॉडेल्सची सुटका, 2 दलालांना अटक

दलालांच्या ताब्यातून सुटका केलेल्या तरुणी भोजपुरी सिनेमे, मॉडेलिंग आणि वेब सीरीजमध्ये काम करणाऱ्या आहे.

0 57

मुंबई : मुंबईतील (Mumbai) मीरा रोड (Meera Road) परिसरात भोजपुरी सिनेमे (bhojpuri film), वेब सीरीज (web series) आणि मॉडलिंग करणाऱ्या तरुणींकडून देहव्यापार करून घेणाऱ्या दोन दलालांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही दलालांच्या तावडीतून तरुणींची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय झोनचे डिसीपी अमित काळे यांच्या टीमने मीरा रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून  S K. स्टोन पोलीस स्टेशनजवळील एका लॉजच्या बाहेर 2 दलालांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 5 तरुणींची सुखरुप सुटका करण्यात आली. दलालांच्या ताब्यातून सुटका केलेल्या तरुणी भोजपुरी सिनेमे, मॉडलिंक आणि वेब सीरीजमध्ये काम करणाऱ्या आहे.

एका खबऱ्याने पोलिसांना याबद्दल माहिती दिली होती. लॉकडाऊन लागल्यामुळे मॉडेल असलेल्या या तरुणींवर रोजगाराची कुऱ्हाड कोसळली होती. काम नसल्यामुळे या तरुणींची आर्थिक परिस्थितीत दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. कामाच्या शोधता असलेल्या या तरुणींचा फायदा घेत दोन्ही दलालांनी पैशांचे आमिष देऊन देहव्यापार करण्यास भाग पाडले.

याबद्दलची माहिती मिळताच पोलिसांनी लॉजबाहेर सापळा रचला. एक बनावट ग्राहक दोन्ही दलालांकडे पाठवण्यात आला. दोघांमध्ये व्यवहार झाला. या दलालांनी त्याला स्टोन पोलीस स्टेशनजवळ असलेल्या लॉजमध्ये बोलावले होते. जेव्हा दलाल ५ तरुणींना घेऊन लॉजवर पोहोचला तेव्हा दबा धरून बसलेल्या पोलिसांनी दोन्ही दलालांना ताब्यात घेतले.

अटक केल्यानंतर मीरा रोड पोलीस स्टेशनमध्ये  PITA ACT. अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पाचही तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.