हिशोब सादर न करणार्‍या ग्रापं सदस्य, उमेदवारांना निवडणूक विभागाची नोटिस

मेहकर

0 17

बुलढाणा जिल्ह्यात 2021 मध्ये 527 ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी झाल्या होत्या. निवडणुकीत उभ्या राहणार्‍या सर्व उमेदवारानी खर्चाचा हिशोब सादर करणे अनिवार्य असते मात्र अद्याप काहींनी अद्याप खर्च सादर न केल्याने तालुक्यातील 110 उमेदवारांना येत्या दोन दिवसात खर्च सादर करा अन्यथा पुढच्या सहा वर्षां साठी ग्राम पंचायतीच्या निवडणुकी साठी उभे राहता येणार नाही अशी सक्त सूचना नोटीसी द्वारे उमेदवारांना देण्यात आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात 2021 मध्ये 527 ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 15 जानेवारी रोजी झाल्या होत्या तेव्हा निवडणूक प्रक्रिया पार पडल्या नंतर 1 महिन्याच्या आत निवडणुकी मध्ये उमेदवाराने केलेला खर्च सादर करावयाचे असते मात्र अद्याप अनेक उमेदवारांनी आपला खर्च सादर केलेला नाही यात मेहकर तालुक्यातील 39 ग्राम पंचायतीच्या निवडणुकी मध्ये उभे असलेले 1 हजार 79 उमेदवारांच्या पैकी 110 उमेदवारांनी आपला खर्च सादर केलेला नाही. त्यांनी 29 मे पर्यंत आपला खर्च मेहकर निवडणूक विभागात सादर करावा अन्यथा निवडणुकीचा खर्च सादर न करणार्‍या उमेदवारास निरह असल्याचे घोषित करून आदेशाच्या तारखे पासून पाच वर्षां पर्यंत सदस्य म्हणून राहण्यास किंवा निवडणुकी मध्ये उभे राहण्यास निरह म्हणून घोषित करण्यात येईल असे निवडणूक विभागाने नोटिस देऊन स्पष्ट केले

Leave A Reply

Your email address will not be published.