आता रेशनिंगला लांबलचक रांग लावायचे दिवस विसरा! भारत सरकार घेऊन आलंय नवकोर अँप; ज्यात घरबसल्या मिळेल राशन

0 12

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
नवी दिल्ली : आता रेशन दुकानात जाऊन रेशन आणण्याची चिंता मिटली. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे रेशनींगच्या दुकानासमोर लांबच्या लांब रांगा लागत आहे. त्यामुळे यावर तोडगा म्हणून सरकारने मेरा रेशन अ‍ॅप सुरू केले आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि प्रवासी मजुरांना परवडणाऱ्या किमतीत धान्य मिळावे यासाठी सरकारकडून वन नेशन वन रेशन कार्ड योजना चालविली जाते. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे आता आपल्याला मेरा रेशन या अ‍ॅपवरून आपल्या वाटणीच राशन घरबसल्या बुक करता येणार आहे.

यासाठी आपल्याला प्रथम Google Play Store वरून माय रेशन अँप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर इंस्टालेशननंतर अ‍ॅपमध्ये आपल्या रेशनकार्डचा तपशील भरावा लागेल. असे केल्यावर आपली नोंदणी पूर्ण होईल. यानंतर आपण अ‍ॅपवरून रेशन मागवू शकता. तसेच हे अँप सध्या फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे. परंतु लवकरच अन्य १४ भाषांमध्येही ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरम्यान, यासंदर्भात अन्न सचिव सुधांशु पांडे म्हणाले की, एनएफएसएचे लाभार्थी, विशेषत: स्थलांतरित लाभार्थी, वाजवी किमतीचे दुकान किंवा रेशन शॉप विक्रेता यांच्यामध्ये ओएनओआरसी संबंधित सेवा सुलभ करणे या मोबाईल अँपचे उद्दिष्ट आहे.

मेरा राशन अ‍ॅपचे फायदे पुढील प्रमाणे

१) रेशन कधी आणि कसे प्राप्त होईल, ते कार्डधारक या अ‍ॅपच्या मदतीने इतर माहिती स्वतः घेऊ शकतील.

२) अनेकदा कित्येक लोकांना एका शहरातून दुसर्‍या शहरात जाताना रेशन सेंटरबद्दल माहिती नसते. त्यामुळे या अ‍ॅपचा सर्वाधिक स्थलांतरितांना फायदा होईल, त्यामुळे या अँपद्वारे या समस्येवर मात करता येईल.

३) रेशन कार्डधारकांना या अ‍ॅपद्वारे नुकत्याच झालेल्या व्यवहारांची माहिती पाहता येईल. महिन्याभरात त्यांना किती रेशन मिळेल ते पाहण्यासही ते सक्षम असतील.

४) या अ‍ॅपद्वारे तुम्हाला तुमच्या नजीकच्या रेशन सेंटरची अचूक माहिती मिळू शकेल. तसेच रेशन विक्रेत्याची संपूर्ण माहिती आपण पाहू शकता. रेशन कार्डधारक या अ‍ॅपद्वारे आपल्या सूचना किंवा तक्रारी नोंदवू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.