सार्वजनिक क्षेत्रातील ही कंपनी देते आहे बक्षीसाची संधी, चांगली आयडीया सुचवा , ५ लाख जिंका

वीज निर्मितीच्या वेळेस कोळशातून निघणारी राख, १०० टक्के वापरात कशी आणावी, यावर उत्तम पर्याय सुचवण्यात यावा, यासाठी 'एनटीपीसी'ने (NTPC) एका स्पर्धेचे आयोजन केले आहे.

0 28

नवी दिल्ली : वीज संयत्रांमधून वीज निर्मितीच्या वेळेस बाहेर पडणाऱ्या कोळशाच्या राखेच्या १०० टक्के पुनर्वापरासाठी उत्तम कल्पना सुचवणाऱ्याला ५ लाख रुपये बक्षिस रुपाने दिले जाणार आहेत. यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असणाऱ्या नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोर्शन म्हणजेच एनटीपीसी ने(NTPC)एका स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेत एकूण १२ लाख रुपयांच्या बक्षिसांचे वाटप केले जाणार आहे. ही स्पर्धा पर्यावरणाच्या रक्षणाच्या हेतूने लोकांना जागरुक करण्यासाठी आणि त्यांच्या कल्पनांचा सुयोग्य वापर करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

एनटीपीसीची स्पर्धा

या स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम मुदत १९ मे २०२१ ही आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना वीज निर्मितीच्या वेळेस त्यातून निघणाऱ्या राखेच्या पुनर्वापरासंदर्भात उपाय सुचवायचा आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी हा उपाय अंमलात आणण्यात येणार आहे. यासाठी एक पॅनल तयार करण्यात आले आहे. सर्वोत्तम कल्पनेची निवड पॅनलकडून केली जाईल. त्यानंतर ही कल्पना सुचवणाऱ्या स्पर्धकाला ५ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.

पर्यावरण संरक्षण

स्पर्धेच्या माध्यमातून एनटीपीसी आपल्या कर्मचाऱ्यांना आणि सर्वसाधारण जनतेला पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरुक करत आपले योगदान देण्यासाठी प्रोत्साहन देते आहे. वीज निर्मिती करताना कोळसा जाळल्याने तयार होणाऱ्या राखेने पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. ही राख सर्वांसाठीच सुरूवातीपासून चिंतेचा विषय आहे. या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी एनटीपीसीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

कोळशाचे राखेचा वापर

एनटीपीसीच्या वीज निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या कोळशाच्या राखेचा वापर सीमेंट, कॉंक्रिट, सेल्युलर कॉंक्रिट, वीट इत्यादी बनवताना केला जातो. कोळशातून निघणाऱ्या या राखेला ड्राय फ्लाय अॅश म्हणतात. ग्राहकांना ती सहज उपलब्ध व्हावी यासाठी सुरक्षित स्टोरेज व्यवस्था तयार करण्यात आली आहे.

७० वीज निर्मिती प्रकल्प

एनटीपीसीचे देशात एकूण ७० वीज निर्मिती प्रकल्प आहेत. यात २६ योजनांची नुतनीकरण होणार आहे. एनटीपीसीची १८ गीगावॅट वीजनिर्मितीची क्षमता आहे. अपारंपारिक ऊर्जानिर्मितीचाही प्रयत्न सुरू आहे. अपारंपारिक ऊर्जा निर्मितीमुळे पर्यावरणाची हानी होत नाही आणि ऊर्जेची गरजसुद्धा पूर्ण होते.

Leave A Reply

Your email address will not be published.