शालेय पोषण आहारातून तेल वगळले,तेलाचा आर्थिक भार मुख्याध्यापकांवर ; तेल खर्चाचे अनुदानही मुख्याध्यापकांना वेळेवर मिळेना.
तेल खर्चाचे अनुदान मुख्याध्यापकांना अदा करण्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेचा एल्गार
बुलडाणा :
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या शालेय पोषण आहाराच्या धान्यादी मालामध्ये आतापर्यंत तेलाचा पुरवठा करण्यात येत होता. परंतु यंदा तेलाचे भाव वाढल्यामुळे तेल वगळण्यात आले आहे.शाळास्तरावरच तेल खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्यामुळे तेल खरेदीचा आर्थिक भार मुख्याध्यापकांवर पडलेला आहे,शाळास्तरावरच खरेदी करावे लागत असलेले तेल यामुळे मुख्याध्यापकांची डोकेदुखी वाढली आहे यंदा शालेय पोषण आहारातून तेल वगळले आहे. त्याचे अग्रीम मुख्याध्यापकांना अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही.
तेल खरेदी करण्याची अग्रीम रक्कम तात्काळ मुख्याध्यापकांना अदा करण्याची अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी किशोर पागोरे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) यांच्याकडे चर्चा करून निवेदनामार्फत केली आहे.
याप्रसंगी सदर मागणीची दखल घेऊन तात्काळ तेल खरेदीची अग्रीम रक्कम मुख्याध्यापकांना अदा करण्याची पुर्तता करण्याचे आश्वासन किशोर पागोरे, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) यांनी दिले आहे.
याप्रसंगी जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
शालेय पोषण आहारासाठी गेल्या वर्षापर्यंत शालेय पोषण आहारात तेल मिळत होते. आता मात्र ते शाळास्तरावर घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे शालेय पोषण आहारास आवश्यक भाजीपाल्याबरोबर आता तेलही आणावे लागणार आहे. त्याचे बिल सहा-सहा महिने मिळत नाही. परिणामी याचा सर्व आर्थिक भार मुख्याध्यापकांवर पडत आहे तरी सदर योजनेचे देयकाची अग्रीम रक्कम दरमहा नियमित मुख्याध्यापकांना अदा करण्यात यावी.
– महेंद्र रोठे,जिल्हाध्यक्ष,जिल्हा प्रहार शिक्षक संघटना,बुलडाणा.