जागतिक परिचारिका दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकरपूर येथे सौ. प्रितीताई दिडमुठे यांनी प्रत्यक्ष भेटून परिचारिकांचा केला सन्मान

0 73

आरोग्य सेवेत परिचारिकांची महत्वाची भूमिका आहे. कोरोना सारख्या कठीण काळात अविरत रुग्णसेवा करणाऱ्या सर्व परिचारिका भगिनींच्या कार्याचा सन्मान करून त्यांना पुढील सेवेकरिता सदृढ आयुष्याच्या साठगांव येथील प्रभारी सरपंच सौ. प्रितीताई दिडमुठे यांनी सदिच्छा दिल्या. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, शंकरपूर चे डॉ. सुजाता शंभरकर, आरोग्य सेविका स्मिता आंबोजकर, तुबंडे, औरासे, नन्नावरे, बालाजी महाल्ले, हजारे व परिचारिका भगिनींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.