एका दिवसात आटपणार बोरीस जॉन्सन भारत दौरा; महत्वाच्या बैठकीत देणार ‘या’ व्यक्तींना प्राधान्य

0 1

प्रतिनिधी:- निवास गायकवाड

नवी दिल्ली : देशात वाढत असलेल्या करोना प्रादुर्भावामुळे ब्रिटीश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या भारत दौऱ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे बोरीस जॉन्सन यांनी आपला भारत दौऱ्याचा कालावधी कमी केला आहे. जॉन्सन २६ एप्रिल रोजी भारतात येणार आहेत.

मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २६ एप्रिल रोजीच त्यांच्या सर्व महत्वाच्या बैठका घेतल्या जाणार आहेत. या बैठकीत भारतातील प्रमुख उद्योगपतीं बरोबरच्या चर्चेला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच जॉन्सन आणि भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधा बाबतीत चर्चा देखील होणार आहे.

यासोबत या दौऱ्यात बोरीस यांनी दिल्ली शिवाय मुंबई, पुणे, बंगलोर आणि चेन्नईला भेट देण्याचे ठरविले होते. पण भारतात कोविड परिस्थिती अतिशय भयानक बनल्याने बोरीस यांची ही भेट दिल्ली पुरती मर्यादित केली गेली आहे.

दरम्यान, यापूर्वी बोरीस २६ जानेवारी २०२१ च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार होते पण त्यावेळी युके मध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याने हा दौरा रद्द केला गेला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.