अंगणवाडी कार्यकर्त्या व पर्यवेक्षिका यांची एक दिवसीय कार्यशाळा

0

 

चिमूर : समाज कल्याण विभाग प. स. चिमूर जी.प. चंद्रपूर यांच्या वतीने शंकरपूर येथे आज दिनांक 31 मार्च 2021 रोज बुधवार ला हनुमान किल्ला मंदिर येथे सकाळी 11:00 वाजता अंगणवाडी कार्यकर्त्या व पर्यवेक्षिका यांची एक दिवसीय कार्यशाळा पार पडली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरपूर ग्रामपंचायतचे नवनियुक्त सरपंच साईश वारजूकर तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच अशोक चौधरी व ग्रामसेवक के.टी. गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुजाता शंभरकर, पर्यवेक्षिका वाघमारे मॅडम उपस्थित होते.


या कार्यशाळेत दिव्यांग प्रतिबंधात्मक माहिती व यावर उपाय व दिव्यांग्या करिता विविध योजना यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक के.टी. गायकवाड तर सूत्र संचालन अंगणवाडी सेविका कालींदा ढोक यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.