एक कोरोना योद्धा हिरावला

0 81

शंकरपुर :

आपल्या जिवाची पर्वा न करता येथे 24 तास वैद्यकीय सेवा देणाऱ्या एक कोरोना योद्धा नियतीने आज हिरावलेला आहे शंकरपूर येथील वैद्यकीय सेवा देणारे डॉ अविनाश माणिकराव ढोक वय 54 वर्ष यांचं कोरोनामुळे चंद्रपूर येथे निधन झाले शंकरपूर येथे ते वैद्यकीय सेवा देत होते या कोरोना काळात त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्ण तपासत होते 24 तासात जेव्हाही कोणत्याही रुग्णाणे त्यांचा दरवाजा ठोठावला तेव्हा ते रुग्णाला तात्काळ उपचार करत होते अविनाश माणिक राव ढोक हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून राजकीय जीवनातील त्यांचा वावर होता ते जिल्हा परिषद सदस्य ,चंद्रपूर जिल्ह्य परिषदेचे समाज कल्याण सभापती पद त्यांनी भूषविलेले आहे शंकरपूर येथे विरोधी गटाचे पॅनल त्यांच्याच नेतृत्वाखाली लढल्याजात होती ते आता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पातळीवर सदस्य असून त्या पक्षात कार्यरत होते कोरोना होत पर्यंत त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू ठेवली होती परंतु जशी तब्येत त्यांची खालावत जात होती तेव्हा त्यांनी कोरोना टेस्ट करून घेतली त्यात ते पाझिटिव्ह आले होते तेव्हापासून विलगीकरनात होते सोमवारी सायंकाळी अचानकपणे त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले होते मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्यामागे आई वडील पत्नी मुलं असा आप्त परिवार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.