विषारी दारूने घेतला एकाचा बळी

0

शंकरपुर : येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या हिरापूर येथील गोपीचंद शामराव नन्नावरे 38 याचे आज पहाटे साडेसात वाजता अचानक निधन झाले.

हिरापूर येथील रहिवासी असलेले गोपीचंद नन्नावरे हे व्यवसायाने ड्रायव्हर होते.काल गाडीवर काही काम नसल्यामुळे दिवसभर शंकरपूर येथे बराच वेळ चहा टपरीवर बसून असल्याचे येथील लोकांकडून सांगण्यात येत आहे. सायंकाळी घरी जायच्या आधी बाहेर जाऊन दारू पिऊन हिरापूर येथे गेले व आज सकाळी साडेसात वाजता पत्नीने चहासाठी उठविल्यानंतर ते बोलत नसल्यामुळे आजूबाजूच्यांना आवाज दिल्यानंतर शेजाऱ्याच्या अचानक मरण पावल्याचे निदर्शनास आले.

गावात विषारी दारूने बळी गेल्याच्या चर्चा घरोघरी सुरू झाल्या. घरातील कर्ता पुरुष गेल्याने उपासमारीची वेळ त्या कुटुंबावर आली आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने अवैद्य धंदे जोमाने चालू असल्याचे लोकांकडून बोलले जात आहे. त्यांच्या मागे पत्नी व मोठा मुलगा वर्ग 9 वा व मुलगी सहावीत शिकत आहे.त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.