आता घरबसल्या वारसनोंद आणि तक्रार अर्ज दाखल करता येणार; महसूल विभागाचा महत्वाचा निर्णय

0 75

शासनाने ऑनलाईन अर्ज आणि तक्रार घेण्यास या ऑनलाईन पद्धतीमध्ये सुरवात केली आहे. जास्तीत जास्त विभाग आता ऑनलाईन आणण्यावर शासनाने भर दिला आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा कागद म्हणजे सातबारा उतारा, फेरफार आणि खाते उताऱ्यापाठोपाठ वारसनोंद! आता घरी बसल्या वारसनोंद आणि तक्रार अर्ज दाखल करता येणार आहे. त्यासाठीची सुविधा महसूल विभागाकडून ऑनलइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारपासून म्हणजेच २४ मे पासून राज्यात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

यापूर्वी तलाठी ऑफिसमध्ये जाऊन वारस नोंद, तक्रार अर्ज, कर्ज बोजा दाखल करणे अथवा कमी करणे, अपाक (अज्ञान पालक कर्ता), एकत्र कुटुंब मॅनेजर (एकुमॅ) नोंद कमी करणे, गॅझेटमधील नावानुसार बदल करणे आदी नोंदी करण्यासाठी जावे लागत होते. आता नागरिकांना त्या कामासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. महसूल विभागाने दिलेल्या ऑनलाईन पर्यायामुळे नागरिक आता ते काम घरी बसून करू शकणार आहेत. त्यासाठी शासनाने ई हक्क प्रणाली विकसित करण्यात आली आहे. महाभूमी या संकेतस्थळावर नोंदणी करून नागरिकांना अर्ज करता येणार आहे. नोंद करण्याची विस्तृत माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नागरिकांना वारसाची नोंद घेण्यासाठी महाभूमी या संकेतस्थळावर अथवा http://pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉगिंग करून ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज संबंधित गावच्या तलाठी यांच्याकडे जाईल. तलाठी या अर्जांची ऑनलाइन पडताळणी करतील. ‘इ-हक्क’ ही प्रणाली देखील बॅंकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर बोजा टाकणे अथवा काढण्यासाठी बॅंकांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तलाठी कार्यालयात त्यांची नोंद घेतली जाणार आहे. नागरीकांना यातून अनेक फायदे होणार आहेत. हे फायदे म्हणजे, हस्तलिखित वारस नोंदवही आणि तक्रार नोंद वही बंद होणार, या कामासाठी तलाठी कार्यालयात न जाता ऑनलाइन अर्ज करता येणार, फक्त जबाब देण्यासाठीच तलाठी कार्यालयात जावे लागणार, ऑनलाइनमुळे तलाठी स्तरावर पेंडन्सी कळणार, आवश्‍यक कागदपत्रे जोडल्यास पंधरा दिवसांत वारस नोंद, त्यापुढील पंधरा दिवसांत फेरफार नोंद होणार

Leave A Reply

Your email address will not be published.