कोरोनाच्या भीतीने शेतकऱ्याची आत्महत्या, दोघा भावांनी पीपीई किट घालून केले अंत्यसंस्कार

0 1

उमरगा (जि.उस्मानाबाद) : तालुक्यातील भिकार सांगवी येथील शेतकऱ्याने दुर्धर आजार त्यात कोरोनाची लागण झाल्याने भितीने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.१७) सकाळी उघडकीस आली. दरम्यान बोरी गावानंतर ही दुसरी घटना आहे. भिकार सांगवी येथील शेतकरी दिलीप माधव भोसले यांना पाठीच्या मणक्यांचा त्रास आणि पाठीत व कमरेवर मुंग्या आल्याचा त्रास होत असल्याने दहा एप्रिलला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर त्यांची रॅपिड चाचणी करण्यात आली. त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोविड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान त्यांनी गृहविलगीकरणाची मागणी केल्याने चौकशीनंतर त्यांना रुग्णालयातुन पाठवण्यात आले. ते स्वतःचे शेतात स्वतंत्र शेडमध्ये राहत होते. मुलांनी सुरक्षितरित्या शारीरिक अंतरावरून खाण्या-पिण्याची व्यवस्था सुरू केली होती. शुक्रवारी (ता.१६) सकाळी गावातील सर्व मंदिरात जावून दिवाबत्ती व नारळ फोडून परत शेतात येऊन रात्रीच्या सुमारास आराम करतो म्हणून मुलाला घराकडे पाठवले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास बाजुला असलेल्या झाडाला त्यांनी गळफास घेतले. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. पोलिस पाटील पंकज पाटील यांनी याची माहिती आरोग्य व पोलिस विभागाला दिली होती. मात्र या विभागाची यंत्रणा पोहचली नाही.

दोन भावांनी केले अंत्यसंस्कार : पोलिस पाटील पंकज पाटील यांनी पीपीई किट उपलब्ध केले. मृत दिलीपचे भाऊ फुलचंद भोसले, राजेंद्र भोसले यांनी पीपीई कीट घालून कुटूंबातील व्यक्तींच्या उपस्थितीत शेतात पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. या प्रकरणी पोलिसात अद्याप नोंद व्हायचा होता.

Leave A Reply

Your email address will not be published.